agriculture news in marathi, Auction on Baramati Market Committee after eight days | Agrowon

आठ दिवसांनंतर बारामती बाजार समितीत लिलाव
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

बारामती : हमीभावासंदर्भात शासन घेत असलेल्या कथित फौजदारी व दंडाच्या कारवाईविरोधात भुसार शेतमाल व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदविरोधात शेतकरी संघटना एकत्र आल्यानंतर पणन संचालक व बाजार समितीनेही व्यापाऱ्यांना सूचना केल्या आणि आज शेतमाल लिलावास पूर्ववत सुरवात झाली.

बारामती : हमीभावासंदर्भात शासन घेत असलेल्या कथित फौजदारी व दंडाच्या कारवाईविरोधात भुसार शेतमाल व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदविरोधात शेतकरी संघटना एकत्र आल्यानंतर पणन संचालक व बाजार समितीनेही व्यापाऱ्यांना सूचना केल्या आणि आज शेतमाल लिलावास पूर्ववत सुरवात झाली.

बारामतीत २६ ऑगस्टपासून अडते असोसिएशनने बेमुदत बंद पुकारला होता. त्यामुळे मागील सोमवार, गुरुवारचे लिलाव झाले नाहीत. दोन दिवसांपूर्वी शेतकरी संघटनांनी बाजार समितीस निवेदन दिले व सोमवारी जर लिलाव पूर्ववत झाले नाहीत, तर व्यापाऱ्यांविरोधात जीवनावश्यक वस्तू कायद्याखाली कारवाई करावी, अशी मागणी केली. गाळे बंद असल्यास आम्ही स्वतः कुलूप तोडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण व रघुनाथदादा पाटील शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडूरंग रायते यांनी दिला होता.

दरम्यान, पणन संचालकांनीही अशा प्रकारचा कोणताही कायदा अजून अंमलात आलेला नाही किंवा असा निर्णय झालेला नाही, असे स्पष्ट केले. त्यातच शेतकरी संघटनेच्या इशाऱ्यानंतर बाजार समितीनेही गाळे व लिलाव सुरू करावेत, अशी सूचना केली. त्यास प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी आज आपले गाळे उघडले. सोमवारी बारामतीत २३७ क्विंटल गुळाची आवक झाली, त्याचा लिलाव करण्यात आला, मात्र बंदबाबत भूमिका स्पष्ट नसल्याने शेतकऱ्यांनी शेतमाल इकडे आणलाच नव्हता. त्यामुळे शेतमालाची मोठी आवक झाली नाही.

दुसरीकडे दुपारी बाजार समितीच्या सभागृहात सहायक निबंधकांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीस समितीचे सभापती अनिल हिवरकर, सचिव अरविंद जगताप, संचालक राजेंद्र झारगड, शेतकरी संघटनांचे राजेंद्र ढवाण, पांडुरंग रायते व त्यांचे सहकारी उपस्थित होते. यामध्ये कोणीतरी लांडगा आल्याची बतावणी करेल आणि व्यापारीही लगेच धावत जाऊन शेतकऱ्यांना वेठीस धरतील, तर ते चालणार नाही, असा इशारा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. यासंदर्भात व्यापाऱ्यांना नोटिसा देण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

इतर बातम्या
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...
पाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...
शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...
हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा  ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
पाण्याअभावी फळबागांवर संकटअकोला : फळबागांसाठी अोळख असलेल्या अकोट तालुक्यात...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
तूर हमीभाव नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठसांगली : खरेदी केंद्रात तूर विक्रीसाठी ऑनलाइन...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...