agriculture news in marathi, Auction of fruits and vegetables will be held in the evening at Solapur Market Committee | Agrowon

सोलापूरात सायंकाळीही होणार फळे, भाज्यांचे लिलाव
टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळच्या लिलावाबरोबर आता सायंकाळीही फळे व भाजीपाल्याचे लिलाव सुरू करण्याचा निर्णय झाला असून, बाजार समितीच्या प्रशासनाने व्यापाऱ्यांशी त्या दृष्टीने सकारात्मक चर्चा केली आहे. साधारणपणे डिसेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.

दरम्यान, बाजार समितीच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांची मोठी सोय होणार आहे. भाजीपाला व फळे बाजार समितीत सकाळी वेळेत पोचली नाहीत, तर संध्याकाळच्या लिलावामुळे त्याचदिवशी त्यांची विक्री होण्याचा पर्याय त्यामुळे मिळणार आहे.

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळच्या लिलावाबरोबर आता सायंकाळीही फळे व भाजीपाल्याचे लिलाव सुरू करण्याचा निर्णय झाला असून, बाजार समितीच्या प्रशासनाने व्यापाऱ्यांशी त्या दृष्टीने सकारात्मक चर्चा केली आहे. साधारणपणे डिसेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.

दरम्यान, बाजार समितीच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांची मोठी सोय होणार आहे. भाजीपाला व फळे बाजार समितीत सकाळी वेळेत पोचली नाहीत, तर संध्याकाळच्या लिलावामुळे त्याचदिवशी त्यांची विक्री होण्याचा पर्याय त्यामुळे मिळणार आहे.

महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक अशा तीन राज्यांच्या सीमेवर असलेली सोलापूर बाजार समिती कांदा, भाजीपाल्यासह डाळिंब, ज्वारी, बेदाणा आदी शेतमालासाठी ओळखली जाते. विशेषतः कांदा बाजारासाठी सोलापूर बाजाराचे नाव सर्वाधिक घेतले जाते.

बाजारातील वाढती आवक आणि शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून बाजार समितीच्या प्रशासनाने सकाळच्या व्यवहाराबरोबर सायंकाळीही शेतीमालाचे लिलाव करण्याचा निर्णय आता घेतला आहे. सोलापूर बाजार समितीची वार्षिक उलाढाल सुमारे ७०० कोटीपर्यंत आहे. सध्या बाजार समितीत फळे व भाजीपाल्याची दिवसाला चार कोटींची उलाढाल होते.

दिवसात पुन्हा एकदा लिलाव होणार असल्याने त्यात आणखी किमान २५ टक्‍क्‍यांची भर पडेल, असा अंदाज आहे. तसेच शेतमालाच्या या लिलावामुळे वाहतुकीची कोंडी, माल ठेवण्याची समस्या, चोरीचे प्रमाण किंवा मालाची असुरक्षितता आदी प्रश्न मार्गी लागणार आहेत.

शेतकरीहिताचा हा निर्णय घेतला आहे. व्यापाऱ्यांनीही सकात्मक प्रतिसाद दिला आहे. बाजार समितीची उलाढाल वाढेलच; पण सर्वाधिक शेतकऱ्यांची सोय होणार आहे. दोन्ही वेळेस सोईनुसार ते लिलावाला फळे व भाजीपाला आणू शकतील. विशेषतः जवळच्या शेतकऱ्यांना भाजीपाल्यासाठी नियमित मार्केट मिळेल. येत्या डिसेंबरपासून प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आहे.
- विनोद पाटील, सचिव, सोलापूर बाजार समिती, सोलापूर

इतर बातम्या
मॉन्सूनने अलिबाग, मालेगावपर्यंतचा भाग...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी...
‘म्हैसाळ’पासून जतचा पूर्व भाग वंचितसांगली : जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६४ गावाला...
विकासकामांचे सूक्ष्म नियोजन करा :...परभणी : जिल्ह्यतील विविध विकास कामांचे सूक्ष्म...
पूर्व विदर्भात दमदार पाऊसनागपूर : पश्चिम आणि दक्षिणेकडून मॉन्सून येणे...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
कोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पाऊसकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...
फिरत्या पशुचिकित्सालयामार्फत पशूंवर...बुलडाणा  : महाराष्ट्र विधानसभेत काल सादर...