agriculture news in marathi, auction in jalgaon market committee | Agrowon

जळगाव बाजार समितीत लिलाव प्रक्रिया केवळ नावालाच
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 30 नोव्हेंबर 2017
लिलाव सकाळीच होतात. अनेकदा शेतीमाल कमी दर्जाचा असतो, उठाव नसतो, म्हणून व्यापारी किंवा अडतदार घेत नाहीत. ज्या मालाची विक्री लागलीच होत नाही तो सुरक्षित, मोफत ठेवण्याची व्यवस्था शेतकऱ्यांसाठी करू. सध्या उत्पादनही कमी असल्याने धान्य फारसे येत नाही.
- लक्ष्मण गंगाराम पाटील, सभापती, जळगाव बाजार समिती
जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलाव प्रक्रिया केवळ नावालाच उरल्याची स्थिती आहे. धान्य आणल्यानंतर ते व्यापाऱ्यांकडे ठेवण्याची वेळ येत असल्याने धान्याच्या आवकेत घट झाल्याची माहिती आहे. 
 
बाजार समितीमध्ये सप्टेंबर महिन्यात धान्य लिलावाची प्रक्रिया सुरू झाली होती. परंतु सध्या आवक झालेल्या पूर्ण धान्याचा लिलाव होत नाही. अर्धेअधिक धान्य शेतकऱ्यांना बाजार समिती यार्डातच ठेवण्याची वेळ येते. त्याची जबाबदारी बाजार समिती स्वीकारत नाही, म्हणून नाईलाजाने हे धान्य अडतदारांच्या दुकानांमध्ये टाकावे लागते. लिलाव प्रक्रिया ठप्प झाल्याचा फटका शेतकऱ्यांसह बाजार समितीला बसू लागला आहे.
 
लिलाव होऊन लागलीच पैसे मिळत नसल्याने शेतकरी पुन्हा चोपडा, अमळनेर बाजार समितीला पसंती देऊ लागले आहेत. शेतीमाल बाजार समितीत पोचविल्यानंतर लागलीच त्याचे पैसे शेतकऱ्यांना हवे असतात. इतर अनेक अडचणी त्यांच्यासमोर असतात. जळगाव बाजार समितीमधील लिलाव प्रक्रिया बारगळल्याच्या प्रकाराकडे पदाधिकाऱ्यांचेही फारसे लक्ष नसल्याची नाराजी शेतकऱ्यांमध्ये आहे. 
 
बाजार समितीमधील धान्य मार्केट यार्डात उडीद, मूग व सोयाबीनची आवक सुरू होती. हरभरा, दादर (ज्वारी)चीदेखील काही प्रमाणात आवक व्हायची. परंतु लिलाव प्रक्रियेवर परिणाम झाल्याने आवकेत घट झाली आहे. रोज ६० ते ७० क्विंटल मूग, १०० ते ११० क्विंटल उडीद आणि ३०० ते ३५० क्विंटल सोयाबीनची आवक होत असल्याची माहिती मिळाली.
 
यातील कमाल धान्याचे लिलाव होत नाहीत. ते अडतदारांकडे ठेवावे लागते, असे सांगण्यात आले. लिलाव प्रक्रिया उघड्यावरच सुरू होती. बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयानजीकच्या मुख्य रस्त्यावर लिलाव व्हायचे. लिलावांसाठी स्वतंत्र शेड व जागा निश्‍चित केली जावी. ती शेतीमाल आणण्यासाठी सुकर असावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

इतर ताज्या घडामोडी
पीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...
सातारा जिल्ह्यातील पश्‍चिम भागात दमदार...सातारा : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील महाबळेश्वर,...
कोल्हापुरात पंधरा लाख लिटर दुधाचे संकलन...कोल्हापूर ः गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये...
बीड जिल्ह्यात दुधाचे संकलन ठप्पबीड : दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...