आॅगस्टच्या पावसाने पिकांना तारले?

आॅगस्टच्या पावसाने पिकांना तारले?
आॅगस्टच्या पावसाने पिकांना तारले?

पुणे : तीन आठवड्यांच्या दीर्घ खंडांनतर दमदार बरसलेल्या पावसाने आॅगस्ट महिन्यातील पावसाची तूट भरून काढली. या पावसाने अडचणीत आलेल्या खरीप पिकांना तारले, तर काही ठिकाणी अतिवृष्टीने हाताशी आलेली पिके डोळ्यांदेखत वाया गेली. या पावसाने राज्यातील अवघ्या ९५ तालुक्यांमध्ये पावसाची सरासरी ओलांडली. तर, २५८ तालुक्यांमध्ये सरासरी गाठता आली नाही. ४४ तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. ऑगस्टमध्ये राज्यातील सर्वच विभागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. सांगलीतील आटपाडी तालुक्यात पावसाने सर्वाधिक ओढ दिली, तर नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात पावसाची मुक्त उघळण झाली. आटपाडीत महिन्याच्या सरासरीच्या ५.७ टक्के, तर अकोले तालुक्यात ३०४ टक्के पावसाची नोंद झाली. तर, पुण्यातील बारामती, सोलापुरातील करमाळा तालुक्यातही पावसाने दडी मारली. तर, पुण्यातील मावळ, साताऱ्यातील महाबळेश्‍वर आणि कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यात दमदार पाऊस पडला.  पावसाच्या मोठ्या दडीमुळे राज्यात खरीप संकटात आला. मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, पश्‍चिम विदर्भ, खानदेशात मोठे संकट उभे राहिले. काही ठिकाणी तर उन्हाळा मोडलाच नाही, अशी स्थिती होती. ऊन-पावसाच्या खेळाने पिकांवर कीडींचा प्रादुर्भावही वाढला. हाता-तोंडशी आलेले पीक हातचे जाण्याच्या भीतीने शेतकरी हाताश झाला. यातच पावसाला सुरवात झाली अन् काहीसा दिलासा मिळाला. मात्र, पिकांच्या वाढीवर परिणाम झाल्याने मूग, उडीद, सोयाबीनसह खारीप पिकांच्या उत्पादनातही घट होणार अाहे. पावसाच्या खंडामुळे होरपळणारी पिके सावरत असतानाच अनेक भागांत अतिवष्टीने नुकसान आणखी वाढले. 

राज्यात विभागनिहाय पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

विभाग सरासरी पडलेला टक्केवारी
कोकण ७५७.१ ५६७.४ ७५
नाशिक १८९.० १४५.५ ७७
पुणे २१६.७ १८७.० ८६
औरंगाबाद १९७.३ १८४.९ ९४
अमरावती २१०.० १८६.२ ८९
नागपूर ३५२.४ २६८.३ ७६
महाराष्ट्र ३०३.३ २३१.२ ७६.२

स्त्रोत :  कृषी विभाग   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com