agriculture news in marathi, Aurangabad in affected bond Larvae | Agrowon

अौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव १४ गावांत नुकसान पातळीवर
टीम अॅग्रोवन
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव सुरवातीपासून दिसून आला आहे. इतरत्र अजून बोंड अळीच्या प्रादुर्भावाने नुकसानीची पातळी ओलांडली नसली तरी औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड व सोयगाव तालुक्‍यातील १४ गावांत मात्र कपाशीवरील बोंड अळीच्या प्रादुर्भावाने नुकसानीची पातळी ओलांडल्याच्या कृषी विभागाच्या पीक परिस्थिती अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. १४ जूनपूर्वी लागवड झालेल्या ओलिताखालील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीवर दिसून आल्याचेही कृषी विभागाकडून स्पष्ट केले आहे.

औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव सुरवातीपासून दिसून आला आहे. इतरत्र अजून बोंड अळीच्या प्रादुर्भावाने नुकसानीची पातळी ओलांडली नसली तरी औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड व सोयगाव तालुक्‍यातील १४ गावांत मात्र कपाशीवरील बोंड अळीच्या प्रादुर्भावाने नुकसानीची पातळी ओलांडल्याच्या कृषी विभागाच्या पीक परिस्थिती अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. १४ जूनपूर्वी लागवड झालेल्या ओलिताखालील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीवर दिसून आल्याचेही कृषी विभागाकडून स्पष्ट केले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्‍यातील लोणी खुर्द महसूल मंडळातील नायगव्हाण, शिवूर महसूल मंडळात बिरोळा, वळण व कविटखेडा या गावातील पिकांची स्थिती आता पाऊस आला तरी सुधारण्याची स्थिती नाही. वैजापूर तालुक्‍यातील २४ गावांमध्ये कमी पावसामुळे बाजरी ६८१ हेक्‍टर, मका २२९६ हेक्‍टर, मूग २४२५ हेक्‍टर, तूर १७८ हेक्‍टर, भुईमूग १४४ हेक्‍टर, उडीद ३२ हेक्‍टर तर कपाशी ६०२५ हेक्‍टर असे एकूण ९५६५ हेक्‍टरी खरिपाचे पीक बाधीत झाले आहे. पैठण तालुक्‍यातील चार महसूल मंडळातील अकरा गावांतील ६८६ हेक्‍टर क्षेत्र कमी पावसामुळे बाधित होण्याची शक्‍यता कृषी विभागाने वर्तविली आहे.

गंगापूर तालुक्‍यातील १२ हजार ९३० हेक्‍टरवरील तर कन्नड तालुक्‍यातील १३६२ हेक्‍टर क्षेत्र कमी पावसामुळे बाधित होण्याची शक्‍यता वर्तविली गेली आहे. बीड जिल्ह्यातील १८ जुलै ते १४ ऑगस्टदरम्यान पावसाच्या खंडामुळे पिकाची वाढ खुंटली होती. १६ ऑगस्टला पडलेल्या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले असले तरी पडलेल्या पावसाच्या खंडामुळे पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्‍यता जास्त आहे.

मराठवाड्यातील पीकनिहाय स्थिती (स्राेत ः कृषी विभाग)
मका :
पावसामुळे मकाची स्थिती सुधारण्याची शक्‍यता मात्र काही ठिकाणी खोडकीड व पोंगेमरचा प्रादुर्भाव
कपाशी : १४ जूनअगोदर लागवड केलेल्या कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भावर नुकसान पातळीवर
तूर : पावसामुळे तूर पिकाला मिळाले जीवनदान, जालना जिल्ह्यात उत्पादकतेवर परिणामाची शक्‍यता
मूग : खंडाने वाढ खुंटली, मावा किडीं, भुरीचा, पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव
उडीद : पावसाच्या खंडाने वाढीवर परिणाम, मावा, पाने खाणाऱ्या अळीचाही प्रादूर्भाव
सोयाबीन : रस शोषण करणाऱ्या किडी, उंट अळी, पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव
बाजरी : वाढीच्या अवस्थेतील पिकाला पावसामुळे जीवदान.

इतर ताज्या घडामोडी
सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍ट्रिक...मुंबई - राज्य सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍...
पाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम...
पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीसकोल्हापूर - जयंती नाल्याचे सांडपाणी थेट...
पदोन्नतीत आरक्षणाचा मार्ग मोकळा;...नवी दिल्ली- अनुसुचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना...
मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पासमुंबई - एसटी महामंडळामार्फत ग्रामीण भागातील...
असा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी...
वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात डॉ...नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन...
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...