औरंगाबादेत चिंच २५०० ते ८५०० रुपये प्रतिक्‍विंटल

औरंगाबादेत चिंच २५०० ते ८५०० रुपये प्रतिक्‍विंटल
औरंगाबादेत चिंच २५०० ते ८५०० रुपये प्रतिक्‍विंटल

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. २३) चिंचेची ३५ क्‍विंटल आवक झाली. तिला २५०० ते ८५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी १२३ क्‍विंटल आवक झालेल्या गाजराचे दर ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १३८ क्‍विंटल आवक झालेल्या कैरीला २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २२ क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीचा दर ५०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ३० क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबाचे दर १००० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ८९ क्‍विंटल आवक झालेल्या द्राक्षाला ३००० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. पेरूची आवक १० क्‍विंटल, तर दर २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. 

२७ क्‍विंटल आवक झालेल्या संत्राचे दर २२०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. चिकूची आवक १५ क्‍विंटल, तर दर १२०० ते २००० रुपये, लालबाग आंब्याची आवक १२ क्‍विंटल, तर दर ५००० ते ७०००, टरबूजाची आवक ३१७ क्‍विंटल, तर दर ५०० ते ९००, खरबुजाची आवक ११५ क्‍विंटल, तर दर १५०० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. हिरव्या मिरचीची आवक २१० क्‍विंटल, तर दर ३००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ८२२ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याला २०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. टोमॅटोची आवक २३३ क्‍विंटल, तर दर ६०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ४८ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला १३०० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ११ क्‍विंटल आवक झालेल्या गवारचे दर ५०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २१ क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीला २००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

वालशेंगाची आवक ४ क्‍विंटल, तर दर २००० ते ३२०० रुपये प्रतिक्‍विंटल, काकडीची आवक ३५ क्‍विंटल, तर दर १५०० ते २२००, लिंबाची आवक १० क्‍विंटल, तर दर ३००० ते ५२००, दुधी भोपळ्याची आवक ३ क्‍विंटल, तर दर ६०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ७७ क्‍विंटल आवक झालेल्या पत्ताकोबीला १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल, तर ६३ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लावरचे दर १००० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.

५ हजार जुड्यांची आवक झालेल्या मेथीला ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ६ हजार ५०० जुड्यांची आवक झालेल्या पालकचे दर ५०० ते ७०० रुपये शेकडा राहिले. ११ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीला ६०० ते ९०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com