agriculture news in marathi, Aurangabad District has moderate rainfall | Agrowon

औरंगाबाद जिल्ह्यात पावसाची दमदार बॅटिंग
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 जून 2018

औरंगाबाद : माॅन्सूनच्या राज्यातील आगमनानंतर सलग चौथ्या दिवशीच्या सकाळपर्यंत मराठवाड्यातील जवळपास ३८ तालुक्‍यांत पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. सोमवारी (ता. ११) सकाळपर्यंत मराठवाड्यातील जालना, परभणी व नांदेड जिल्ह्यातील २५ मंडळांत जोरदार पाऊस झाला. यामधील तब्बल २१ मंडळे एकट्या नांदेड जिल्ह्यातील आहेत. नांदेड जिल्ह्यातील आठ तालुक्‍यांत सरासरी ५० ते ९२ मिलिमीटरपर्यंत पावसाची नोंद झाली आहे.

औरंगाबाद : माॅन्सूनच्या राज्यातील आगमनानंतर सलग चौथ्या दिवशीच्या सकाळपर्यंत मराठवाड्यातील जवळपास ३८ तालुक्‍यांत पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. सोमवारी (ता. ११) सकाळपर्यंत मराठवाड्यातील जालना, परभणी व नांदेड जिल्ह्यातील २५ मंडळांत जोरदार पाऊस झाला. यामधील तब्बल २१ मंडळे एकट्या नांदेड जिल्ह्यातील आहेत. नांदेड जिल्ह्यातील आठ तालुक्‍यांत सरासरी ५० ते ९२ मिलिमीटरपर्यंत पावसाची नोंद झाली आहे.

जोरदार पाऊस झालेल्या मराठवाड्यातील ४० तालुक्‍यांत जालना जिल्ह्यातील दोन, परभणीमधील सात, हिंगोलीतील तीन, नांदेडमधील सोळा, बीडमधील तीन, लातूरमधील सहा; तर उस्मानाबादमधील एका तालुक्‍याचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्याकडे मात्र तूर्त पावसाची पाठ असल्याचेच चित्र आहे. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्‍यात सरासरी ५२. ४० मिलिमीटर पाऊस झाला. त्यापाठोपाठ मंठा तालुक्‍यात ३३ मिलिमीटर तर जालना तालुक्‍यात ११.६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

जालना तालुक्‍यातील विरगाव मंडळात ६५ मिलिमीटर पाऊस पडला. परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्‍यात सरासरी २८.२५ मिलिमीटर, पालम १२, पुर्णा ५१, सोनपेठ २६, सेलू ३०.४०, पाथरी १८.६७, जिंतूर २७.८३ तर मानवत तालुक्‍यात सरासरी ५२. ३३ मिलिमीटर पाऊस झाला. परभणीतील ताडकळस मंडळात ८१ मिलिमीटर, देऊळगाव ७० तर मानवत मंडळात ७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्‍यात १४ मिलिमीटर, वसमत ३६.४३ तर औंढा नागनाथ तालुक्‍यात २६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्‍यात सरासरी १८.६० मिलिमीटर, माजलगाव १६.६७, परळी तालुक्‍यात सरासरी २७.८० मिलिमीटर पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्‍यात २६.७५, उदगीर १८.२९, चाकूर ३९.२०, जळकोट १२.५०, देवणी तालुक्‍यात ४२.६७, शिरूर अनंतपाळ तालुक्‍यात सरासरी १७ मिलिमीटर पाऊस पडला. भूम तालुक्‍यात सरासरी २१.६० मिलिमीटर, वाशी तालुक्‍यात १२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

नांदेड जिल्ह्यात धुव्वाधार पाऊस
नांदेड जिल्ह्यातील मुखेड, देगलूर व किनवट तालुक्‍यातील हलका ते मध्यम पाऊस वगळता उर्वरित तालुक्‍यात चांगला पाऊस झाला. जिल्ह्यातील ८० मंडळांपैकी २१ मंडळांत पावसाची बॅटिंग जोरदार राहिली. नांदेड शहर मंडळात ९० मिलिमीटर, विष्णुपुरी ७३, वसरणी ६५, वजीराबाद ९५, नांदेड ग्रामीण ७३, तरोडा ९०, लिंबगाव ७८, मुदखेड ८०, मुगट ९०, बारड ७८, भोकर ८७, किनी १०४, मोघाळी ९५, मातूळ ८५, उमरी.

इतर ताज्या घडामोडी
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...