औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस

औरंगाबाद जिल्ह्यातील १७ मंडळांत पाऊस
औरंगाबाद जिल्ह्यातील १७ मंडळांत पाऊस

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६५ पैकी १७ मंडळांत रविवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत हलका, तुरळक तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील बहुतांश भागात शनिवारी (ता. १५) दिवसभर उन्ह सावलीचा खेळ सुरू होता. सायंकाळनंतर आकाशात ढगांची गर्दी होणे सुरू झाले. रविवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत औरंगाबाद, फुलंब्री तालुक्‍यांतील प्रत्येकी एक, पैठण तालुक्‍यातील सहा, वैजापूर तालुक्‍यातील दोन, गंगापूर तालुक्‍यातील सात मंडळांत पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. 

१ ते ५७ मिलिमीटरपर्यंत पडलेला हा पाऊस गंगापूर तालुक्‍यातील मांजरी मंडलात सर्वाधिक ५७ मिलिमीटर पडला. त्यापाठोपाठ गंगापूर मंडळात ३४ मिलिमीटर, भेनडाला मंडलात २१ मिलिमीटर, पैठण तालुक्‍यातील पिंपळगाव पि. मंडळात ३३ मिलिमीटर अशा दखलपात्र पावसाची नोंद झाली. रविवारी सकाळी ९ वाजेपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण उष्णता वाढल्याची स्थिती होती.

जालना जिल्ह्यातील काही भागात रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागात ढगाळ वातावरण होते. अणदूर परिसरात रविवारी पहाटे चार वाजेपासून अधूनमधून हलक्‍या सरी कोसळत होत्या. आलूर परिसरातही अधूनमधून रिमझिम पावसाची हजेरी सुरू होती. नळदूर्ग परिसरात रविवारी पहाटे पावसाची रिमझिम सुरू झाली होती. तर अनाळ परिसरात रविवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास जवळपास १५ मिनिटे पाऊस झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com