औरंगाबादेत बटाटा ३०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटल

औरंगाबादेत बटाटा ३०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटल
औरंगाबादेत बटाटा ३०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटल

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १२) ११०० क्‍विंटल बटाट्याची आवक झाली. त्याला ३०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची १४५ क्‍विंटल आवक झाली. तिला २८०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १७७१ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर ७५ ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ९९ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लाॉवरला १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २११ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे दर ४०० ते १७५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.

२५ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला १६०० ते २०००, ३ क्‍विंटल आवक झालेल्या गवारला ४५०० ते ६०००, ३२ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीला १५०० ते २४००, १२ क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीला ३००० ते ५०००, ५८ क्‍विंटल आवक झालेल्या पत्ताकोबीला ७०० ते १०००, ११ क्‍विंटल आवक झालेल्या लिंबाला १५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

१३३ क्‍विंटल आवक झालेल्या गाजरला ८०० ते ११०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. शेवग्याची आवक २८ क्‍विंटल, दर ३००० ते ४५००,  ढोबळ्या मिरचीची आवक ४१ क्‍विंटल, तर दर २५०० ते ३०००, वाटाण्याची आवक २६३ क्‍विंटल, तर दर १५०० ते १८०० रुपये प्रतक्‍विंटल मिळाला. ३ क्‍विंटल आवक झालेल्या वालशेंगांचे दर ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ११ हजार जुड्यांची आवक झालेल्या मेथीला २०० ते ४००, ८ हजार जुड्यांची आवक झालेल्या पालकला २०० ते ३००, ११ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीला ३०० ते ५०० रुपये प्रतिशेकडा दर मिळाल्याची माहिती माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

फळे आवक (क्‍विंटलमध्ये) दर (प्रतिक्‍विंटल)
मोसंबी ५३  १००० ते ३५०० 
डाळिंब ८९ ८०० ते ३२०० 
अंजीर १४  ३५०० ते ५००० 
बोर २७ ८०० ते १३०० 
पेरू १३  १००० ते १८००
ॲपल बोर २५ ८०० ते १४०० 
सफरचंद ३०० ४००० ते ८०००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com