agriculture news in marathi, In Aurangabad, the incidence of lime is increased | Agrowon

मराठवाड्यात हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढला
टीम अॅग्रोवन
शनिवार, 7 जुलै 2018

औरंगाबाद : अनुकूल हवामानामुळे सध्या टाकळी माळी परिसरात हुमणीचा प्रादुर्भाव वाढत आहे. या परिसरातील शेतकरी गणेश विनायक बुरकूल यांच्या कपाशी लागवडीमध्ये सध्या हुमणीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून मराठवाड्यात विविध पिकांच्यामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव वाढला आहे. अवेळी होणारा पाऊस, दोन पावसात पडलेला मोठा खंड या बाबी हुमणीच्या वाढीस कारणीभूत ठरत आहेत.

हुमणीची अळी पिकाची मुळे खाते. यामुळे पिकाचा अन्नपुरवठा खंडित होऊन, पाने पिवळी पडू लागतात. प्रादुर्भाव झाल्यास एका ओळीतील सलग रोपे वाळलेली दिसतात. पूर्ण वाढ झालेली अळी जमिनीतच कोषावस्थेत जाते.

 नियंत्रणाचे उपाय ः
 हुमणीचे कार्यक्षम व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांनी सामुदायिकरित्या सलग तीन वर्ष भुंगेऱ्यांचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करावे.
 शेती परिसरातील झाडावर वीस किंवा त्यापेक्षा जास्त हुमणीचे भुंगेरे आढळल्यास पाण्यात मिसळणारी कार्बारील भुकटी (५० टक्‍के) ४० ग्रॅम किंवा क्‍विनॉलफॉस (२५ टक्‍के ईसी) २० मि.लि. किंवा इमिडाक्‍लोप्रीड (१७.८ टक्‍के एसएल) १५ मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणीनंतर आठ तासांत पाऊस आल्यास पुन्हा कीडनाशकांची फवारणी करावी.
संपर्क ः डॉ. किशोर झाडे, ९९२१८०८१३८
 (कृषी विज्ञान केंद्र, औरंगाबाद)

इतर अॅग्रो विशेष
दूध दरवाढ निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत...कोल्हापूर: दूध संघांनी गायीच्या दुधास २५ रुपये...
विदर्भ, मराठवाडा विकासासाठी २२ हजार...नागपूर (विशेष प्रतिनिधी) ः विदर्भ, मराठवाडा आणि...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारापुणे : बंगालच्या उपसागरात शुक्रवारी (ता. २०...
जमिनीच्या सुधारणेसह आले पिकाची...जमिनीची सुपीकता टिकवणे हे सर्वात महत्त्वाचे झाले...
रोजगार शोधार्थ गाव सोडलेले निवृत्ती...शेतीतून शाश्‍वत उत्पन्नाची हमी नसल्यामुळे कोकर्डा...
कुटुंब एेवजी व्यक्ती घटक माणून कर्जमाफी...नागपूर : "शेतकरी सन्मान योजने" साठी आता कुटुंब...
सर्व इथेनॉल खरेदीची केंद्र शासनाची...नागपूर : अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला...
गनिमी काव्याने ‘जाम’पुणे: दूध उत्पादकांनी गनिमी कावा करत राज्यभरात...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
`एफआरपी`चे कारखाने संघाकडून स्वागतपुणे : साखर कारखाने अडचणीत असतानाही एफआरपीमध्ये...
पीकविमा सर्व्हर ‘अंडर मेंटेनन्स’अकोला  ः या खरीप हंगामात लागवड केलेल्या...
सेंद्रिय ऊस, हळद, खपली गव्हाला मिळवली...सांगली जिल्ह्यातील आरग येथील जयकुमार अण्णासो...
दूध पावडर बनली आंदोलनाची ठिणगीपुणे : राज्यातील दूध आंदोलनाला दूध पावडरची समस्या...
दूधाला २५ रुपये दर; आंदोलन मागेनागपूर : गायीच्या दुधाचा खरेदी दर प्रति लिटर...
होले झाले कलिंगड, खरबुजातील ‘मास्टर’पुणे जिल्ह्यातील बिरोबावाडी येथील केशव होले या...
शेतकरी केंद्रस्थानी ठेवून आखावी धोरणे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील शेतकरी,...
‘निधी’चे सिंचनसर्वाधिक धरणांची संख्या असलेल्या आपल्या राज्याचा...
पेरूसाठी अतिघन लागवड पद्धत उपयुक्तपेरू हे फळझाड व्यापारीदृष्ट्या फार महत्त्वाचे...
ऊस ‘एफआरपी’त २०० रुपये वाढनवी दिल्ली ः ऊस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी ‘...
स्वाभिमानीचा आज ‘चक्का जाम’पुणे: दुधासाठी शेतकऱ्यांना थेट पाच रुपये अनुदान...