agriculture news in marathi, In Aurangabad, the rate of green chilli hike | Agrowon

औरंगाबादेत हिरव्या मिरचीचे दर किंचित वाढले
संतोष मुंढे
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत महिनाभरात आवकेत चढउतार असलेल्या हिरव्या मिरचीचे दर किंचित वधारले आहेत. दुसरीकडे कांद्याचे दर १०० ते १००० दरम्यान राहिल्याचे पाहायला मिळाले. सोमवारी(ता. १) बाजार समितीमध्ये ८० क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला ८०० ते १२०० रुपये तर ३८३ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याला ३०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत महिनाभरात आवकेत चढउतार असलेल्या हिरव्या मिरचीचे दर किंचित वधारले आहेत. दुसरीकडे कांद्याचे दर १०० ते १००० दरम्यान राहिल्याचे पाहायला मिळाले. सोमवारी(ता. १) बाजार समितीमध्ये ८० क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला ८०० ते १२०० रुपये तर ३८३ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याला ३०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये १ सप्टेबरला कांद्याची ३०४ क्‍विंटल आवक झाली होती. या कांद्याला ३०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ६ सप्टेबरला ६०४ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याला १०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १५ सप्टेंबरला ४४७ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर २०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २२ सप्टेंबरला कांद्याची आवक ३७६ क्‍विंटल झाली. या कांद्याला १०० ते ६०० रूपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २५ सप्टेंबरला ४९५ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर १२५ ते ९५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २९ सप्टेंबरला ३९४ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याला २०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

हिरव्या मिरचीची आवक ८० ते १८३ क्‍विंटल दरम्यान राहिली. १ सप्टेंबरला १६२ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ६ सप्टेंबरला १८३ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचे दर ६०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १५ सप्टेंबरला १४१ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला ४०० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २२ सप्टेंबरला मिरचीची आवक ११५ क्‍विंटल तर दर ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २५ सप्टेंबरला १३१ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला ६०० ते१००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २९ सप्टेंबरला १४२ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचे दर ७०० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
केळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...
रताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...
औरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...
मराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...
तुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...
टँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...
दिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...
सातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...
नाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...
कर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...
योग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...
परभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
भाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...
यंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई  ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...
अटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...
कर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...
ग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...
प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...