कोल्हापूर रेकवर दोन दिवसांत युरियाची मुबलक उपलब्धता

कोल्हापूर रेकवर दोन दिवसांत युरियाची मुबलक उपलब्धता
कोल्हापूर रेकवर दोन दिवसांत युरियाची मुबलक उपलब्धता

कोल्हापूर : ऐन खरीप हंगामात पुरेसा खत पुरवठा होत नसल्याने हैराण झालेल्या शेतकरी व विक्रेत्यांना दिलासा मिळणार आहे. येत्या दोन दिवसांत बहुतांशी खत कंपन्या कोल्हापूर रेकला युरियासह आवश्‍यक ती खते आणणार आहेत. खत पुरवठ्याबाबत मंगळवारी (ता. १०) झालेल्या कृषी अधिकारी व कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबतचे वृत्त ॲग्रोवनमध्ये सोमवारी (ता. ९) प्रसिद्ध झाले होते. यानंतर तातडीने बैठक घेऊन कंपन्यांनी जास्तीत जास्त खते कोल्हापूर रेकवर आणावीत, असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केल्यानंतर कंपन्यांनी याला सहमती दर्शविली.

रेल्वेशी करार संपल्याचे कारण देत अनेक कंपन्यांनी यरियासह अन्य खते कोल्हापूर ऐवजी सांगलीत उतरविली होती. जिल्ह्यातील पश्‍चिम भागातील विक्रेत्यांना ही खते सांगलीहून आणून पश्‍चिम भागात विक्री करावी लागत होती. वाहतूक खर्च वाढल्याने एम.आर.पी. पेक्षा जादा दराने खत विक्री करीत होती. यामुळे खतेवाहतुकीमुळे महाग पडत असल्याने मुख्यत्वे करून युरिया खताचा पुरवठा विस्कळित झाला होता. याबाबतचे वृत्त ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध होताच विक्रेत्यांच्या संघटनेनेही विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांची भेट घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट केली.

या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषद कृषी विभागात खत नियंत्रण समितीची तातडीची बैठक झाली. यात कंपन्यांच्या प्रतिनिधींनाही आमंत्रित करण्यात आले. या वेळी रेल्वेशी करार संपल्याचे कारण देत कंपन्यांनी कोल्हापुरात रेक आणला नसल्याचे सांगितले. तातडीने प्रोसिजर पूर्ण करून खते कोल्हापूर रेकवर उपलब्ध करावीत, अशा सूचना कृषी अधिकाऱ्यांनी दिल्या. या वेळी विभागीय कृषी संहसंचालक उमेश पाटील, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com