अकोलासह वाशीम जिल्ह्यामध्ये सरासरीच्या ९० टक्के पाऊस

अकोलासह वाशीम जिल्ह्यामध्ये सरासरीच्या ९० टक्के पाऊस
अकोलासह वाशीम जिल्ह्यामध्ये सरासरीच्या ९० टक्के पाऊस
अकोला : वऱ्हाडात या महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अाॅगस्टमध्ये अकोला आणि वाशीम जिल्ह्यांत वार्षिक सरासरीच्या ९० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला अाहे. दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात मात्र अद्याप कमी पाऊस असल्याने वार्षिक सरासरीच्या तुलनेत ६३ टक्केच पाऊस पडलेला अाहे.
वऱ्हाडातील अकोला जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६९७ मिलिमीटर एवढी अाहे. त्यातुलनेत अातापर्यंत ६४४.९२ मिलिमीटर म्हणजे ९२.४९ टक्के पाऊस झाला. वाशीमची वार्षिक सरासरी ७९८.७ मिली असून अातापर्यंत  ७३१ मिलिमीटर म्हणजेच ९१.६४ टक्के पाऊस झाला. दुसरीकडे बुलडाण्याची वार्षिक सरासरी ६६७.८ मिली असून अातापर्यंत ४२३ मिलिमीटर पाऊस पडला. सरासरीच्या ६३.६८ टक्केच हा पाऊस झालेला अाहे. या जिल्ह्यातील खामगाव (४७.०९), नांदुरा (४५.६९) या दोन तालुक्यांची सरासरी तर ५० टक्क्यांच्या अातच अाहे.
बुलडाण्यातील पावसाची स्थिती मात्र अद्याप सुधारलेली नाही. अाॅगस्टमधील पावसाने दिलासा दिला, तरी अकोला, वाशीमच्या तुलनेत हा जिल्हा खूपच पिछाडीवर पडलेला अाहे. खामगाव, नांदुरा तालुक्यांतील पावसाची स्थिती बिकट अाहे. या जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प अद्यापही २० टक्क्यांच्या अात अाहे. खडकपुर्णासारखा मोठा प्रकल्प कोरडा पडलेला आहे.     
दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत वार्षिक सरासरी भरून निघते. मागीलवर्षी कमी पाऊस झाला होता. याही हंगामात जून, जुलैमध्ये जेमतेम पाऊस नोंदविला गेला. मात्र, अाॅगस्टमध्ये चांगला पाऊस पडल्याचा परिणाम अकोला, वाशीममध्ये सरासरीच्या तुलनेत मोठी झेप घेतली. या पावसामुळे दोन्ही जिल्ह्यातील अनेक प्रकल्प तुडुंब भरून वाहत अाहेत. अद्याप पावसाचा एक महिना राहिलेला असून पावसाळी वातावरण तयार झालेले अाहे. यावर्षी संपूर्ण प्रकल्प भरतील अशी लक्षणे अाहेत. 
वऱ्हाडातील प्रमुख प्रकल्पांमधील साठा
प्रकल्प  मिटरमध्ये  टक्के
काटेपूर्णा ३४६.९३ ८५.३८
मोर्णा ३६२.८५ ४७.९२
निर्गुणा  ३९१.४०  १००
उमा    ३४४ १००
दगडपारवा   ३१४.६०  २३.१५
वान  ४०९.९३ ८७.७७
पोपटखेड  ८४.९० ३.१४
 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com