नगर जिल्ह्यात गहू, हरभऱ्याची सरासरीएवढी पेरणी

पेरणी
पेरणी

नगर ः जिल्ह्यामध्ये यंदा हरभरा, गव्हाची सरासरीएवढी पेरणी झाली आहे. आतापर्यंत गव्हाचे ६९ हजार ३८४ हेक्‍टर, तर हरभऱ्याचे ८५ हजार ४५३ हेक्‍टर क्षेत्र झाले आहे. नगर तालुक्‍यात यंदा सर्वाधिक गहू पेरला आहे. कापसाचे क्षेत्र बोंड आळीने बाधित झाल्यानंतर कापूस उपटून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी हरभरा, गव्हाला पसंती दिली आहे. दुष्काळी तालुक्‍यातही पेरणी क्षेत्र वाढले. नगर जिल्ह्यामध्ये गव्हाचे सरासरी ६९ हजार ४६१ हेक्‍टर, तर हरभऱ्याचे सरासरी ८३ हजार ७९५ हेक्‍टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा मात्र दोन्ही पिकांनी रब्बीत सरासरी ओलांडली आहे. यंदाच्या पावसाळ्यात परतीच्या पावसाच्या काळात जोराचा पाऊस झाला. त्यानंतर बऱ्याच काळ ज्वारीची पेरणी करता आली नाही. शिवाय कापसाला बोंड आळीचा फटका बसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बोंड आळीने बाधित झालेला कापूस उपटून तेथे गहू, हरभरा करण्यावर भर दिला. त्यामुळे जिल्ह्यात दोन्ही पिकांचे क्षेत्र वाढले आहे.  आतापर्यत गव्हाची ६९ हजार ३८४ हेक्‍टर, तर हरभऱ्याची ८५ हजार ४५३ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. नगर तालुक्‍यात हरभऱ्याची १३,२०१, तर गव्हाची ७,८९३ हेक्‍टर, पारनेरमध्ये हरभऱ्याची २,९२०, तर गव्हाची आठशे दहा हेक्‍टर, श्रीगोद्यात हरभऱ्याची ८,१०६, तर गव्हाची ६,४३०, कर्जतमध्ये हरभरा १०,०६९, तर गव्हाची ७,२२३, जामखेडला हरभऱ्याची ६,६९५, तर गव्हाची ५,४६९, शेवगाव तालुक्‍यात हरभऱ्याची ४,०५०, गव्हाची १,८०० हेक्टरवर पेरणी झाली.  पाथर्डी तालुक्‍यात हरभरा ६,००७, तर गव्हाची ५,०८४, नेवासा तालुक्‍यात हरभऱ्याची ६,०३१, तर गव्हाची ५,११६, राहुरी तालुक्‍यात हरभऱ्याची ३,०३०, तर गव्हाची ४,३९७, संगमनेर तालुक्‍यात हरभऱ्याची ३,८७२, तर गव्हाची ३,५६६, अकोले तालुक्‍यात हरभऱ्याचे १,९०२, तर गव्हाची २,०३१, कोपरगाव तालुक्‍यात हरभऱ्याची ४,६८३, तर गव्हाची ७,०४७, श्रीरामपूर तालुक्‍यात हरभऱ्याची ६,८८५, तर गव्हाची ६,१०४ व राहाता तालुक्‍यात हरभऱ्याची ८,००२, तर गव्हाची ६,३१४ हेक्‍टर क्षेत्रावर पेरा झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com