agriculture news in marathi, Avoid giving crop loans to nationalized banks; Pictures of Dhule, Jalgaon District | Agrowon

राष्ट्रीयीकृत बॅंकांची पीककर्ज देण्यास टाळाटाळ ; धुळे, जळगाव जिल्ह्यातील चित्र
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 जून 2018

जळगाव : धुळे व जळगाव जिल्ह्यांत खरीप पीककर्ज वितरणाची गती अतिशय कमी आहे. संबंधित जिल्ह्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांनी बॅंकांना नोटिसा बजावून, आदेश देऊनही कार्यवाही व्यवस्थित सुरू नसल्याची स्थिती आहे. यातच राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये पीककर्ज वितरणाबाबत टाळाटाळ केली जात असून, बॅंकांच्या शाखांमध्ये व्यवस्थापकच जागेवर नसतात, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

जळगाव : धुळे व जळगाव जिल्ह्यांत खरीप पीककर्ज वितरणाची गती अतिशय कमी आहे. संबंधित जिल्ह्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांनी बॅंकांना नोटिसा बजावून, आदेश देऊनही कार्यवाही व्यवस्थित सुरू नसल्याची स्थिती आहे. यातच राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये पीककर्ज वितरणाबाबत टाळाटाळ केली जात असून, बॅंकांच्या शाखांमध्ये व्यवस्थापकच जागेवर नसतात, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना चार महिन्यांपूर्वीच कर्ज फेडीचे दाखले दिले आहेत. परंतु त्यांना नव्याने कर्ज दिलेले नाही. फक्त सर्च रिपोर्ट, कागदपत्रे गोळा करायला सांगितले आहे. त्यासाठी चार ते पाच हजार रुपये खर्च करूनही नवे पीककर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढतच आहेत. ग्रामीण भागातील काही बॅंकांनी तर शेतकऱ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन कृषी शाखेशी संपर्क साधा, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

 जळगाव जिल्ह्यात सुमारे १ हजार ६०० कोटी रुपये पीककर्ज खरिपात वितरित करायचे आहे. त्यानुसार जिल्हा बॅंक सर्वाधिक कर्ज देणार असून, त्यासाठी गतीने काम सुरू अाहे. या बॅंकेने मोठा लक्ष्यांक गाठला आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी मात्र २० टक्केही लक्ष्यांक पूर्ण केलेला नाही. धुळे जिल्ह्यात सुमारे ७०० कोटी रुपये खरिपात पीककर्ज वितरणाचा लक्ष्यांक सर्व बॅंकांना दिला आहे.

धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने कामकाज गतीने करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या जिल्हा उपनिबंधक कार्यालय व जिल्हा बॅंकेशी संबंधित सोसायट्यांचे सचिव यांचे कर्जमेळावे घेतले जात आहेत. परंतु राष्ट्रीयीकृत बॅंकांनी १० टक्‍केही कर्ज वितरण लक्ष्यांक पूर्ण केलेला नाही. शेतकरी रोज बॅंकेभोवती चकरा मारीत आहेत. गावातून येण्यासाठी त्यांना भाडे खर्च करावे लागते. कामे खोळंबतात. परंतु त्यांची समस्या सुटत नसल्याची स्थिती आहे. नंदुरबार जिल्ह्यातही पीककर्ज वाटप धीम्या गतीने सुरू आहे. या जिल्ह्यात सुमारे ६०० कोटी रुपये कर्ज वितरण अपेक्षित असून, यातून ८० कोटींचे वितरणही राष्ट्रीयीकृत बॅंकांनी केलेले नसल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.

इतर बातम्या
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
पुणे विभागात हरभरा, गव्हाची काढणी...पुणे ः उन्हाचा चटका वाढल्याने रब्बी हंगामातील गहू...
पूर्व भागात कृष्णा, वारणा नद्या पडल्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पूर्व भागात कृष्णा व...
ताकारीच्या तिजोरीत १३ कोटी शिल्लकवांगी, जि. सांगली ः मागील १५ वर्षांपासून दरवर्षी...
गिरणा नदीतून पाण्याची ग्रामस्थांना...जळगाव ः पिण्याच्या पाण्यासंबंधी सोडलेले गिरणा...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
दुबळवेल ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कारवाशीम : नागरिकांना अावश्यक असलेल्या पायाभूत...
नांदेड, परभणी, हिंगोलीत अन्नत्याग आंदोलननांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
दुष्काळी भागाला मिळतोय चिंचेचा आधारशिरूर कासार, जि. बीड ः दुष्काळाच्या गंभीर झळा...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
छोट्या शेतकऱ्यांच्या समस्या कायम ः...राहुरी विद्यापीठ, जि. नगर : विविध पिकांच्या...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...