agriculture news in marathi, avoidance for new crop loan distribution to farmers, buldhana, maharashtra | Agrowon

बुलडाण्यात शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास बँकांकडून टाळाटाळ
टीम अॅग्रोवन
बुधवार, 30 मे 2018

माझे खाते बँक अाॅफ महाराष्ट्रच्या बावनबीर शाखेत अाहे. माझ्याकडे व्याजासह ५९ हजार रुपये पीककर्ज होते. मला कर्जमाफी मिळाली. मात्र ती देताना बँकेने २४५२ रुपये भरायला सांगितले. तसेच अाता तुमच्या गावातील बॅंकेतून पीककर्ज घेण्यास सांगितले. गावात असलेल्या ग्रामीण बँकेत गेलो, तर त्यांनी तुम्ही तुमच्या मूळ बँकेतूनच पीककर्ज घ्या, असे सुचविले. अाता अाम्ही शेतकऱ्यांनी नवीन बँकेतून कर्ज घेतले तर अामची पत नव्याने सुरू होईल. यातून माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होणार अाहे.

-श्रीकृष्ण ढगे, शेतकरी, वरवट बकाल, जि. बुलडाणा.
बुलडाणा ः कर्जमाफी झाली...काहींचे कर्ज खाते ‘नील’ झाले...काहींबाबत ही प्रक्रिया सुरू अाहे. ज्यांची खाती कर्जमुक्त झाली, असे शेतकरी अाता अापल्या मूळ शाखांकडे गेले असता या बँकांकडून पीककर्ज देण्यास टोलवाटोलवी केली जात अाहे. यामुळे शेतकऱ्यांची एेन हंगामाच्या तोंडावर चिंता वाढली अाहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी, की जिल्हयात जिल्हा मध्यवर्ती बँक अवसायनात निघाल्यानंतर अनेक खातेदार शेतकऱ्यांची खाती ही एकाच शाखेकडे जास्त भार निर्माण होऊ नये, यासाठी विविध गावांतील राष्ट्रीयीकृत बँकांकडे वर्ग करण्यात अाली होती. या बँकांकडून शेतकरी नियमित व्यवहारासह पीककर्ज घेत होते. शासनाने कर्जमाफी केल्याने अनेक शेतकरी कर्जमुक्त झाले. त्यामुळे अागामी हंगामासाठी हे शेतकरी पुन्हा अापल्या बँकेत कर्ज मागणीसाठी गेले असता, या बँक शाखा प्रशासनाकडून शेतकऱ्यांना कर्ज देण्यास स्पष्ट नकार दिला जात अाहे.
 
वरवट बकाल येथील काही शेतकऱ्यांना बावनबीर येथील बँक अाॅफ महाराष्ट्रच्या शाखेत काही वर्षांपूर्वी वर्ग केलेले आहे. हे शेतकरी अाता कर्ज मागणीसाठी गेले तर त्यांना बँक अधिकाऱ्यांनी स्पष्ट नकार देत तुमच्या गावातील बँकेतून कर्ज घ्या, असे सांगितले.
 
हे शेतकरी गावातील ग्रामीण बँकेच्या शाखेत कर्ज मागणीसाठी गेले तर त्यांना येथील अधिकाऱ्यांनी असा काही नियम नसल्याचे सांगत तुम्ही जुन्याच बँकेतून कर्ज घ्या, असे सांगण्यात अाले. गावातील ग्रामीण बँकेतून कर्ज घ्यायचे तर या ठिकाणी हे शेतकरी नवीन खातेदार बनतील. त्यामुळे पीककर्ज मिळण्याची त्यांची पत अापोअाप कमी होईल, याची भीती शेतकऱ्यांना वाटत अाहे. एकूणच सध्या हा गोंधळ वाढत चालला अाहे.  
 
पीककर्ज घेण्यास शेतकऱ्यांना क्षेत्राचे बंधन नाही. रिझर्व्ह बँकेचे सर्क्युलर सगळ्यांना दिले. ग्रामीण बँकेत काही प्रमाणात अडचणी अाहेत. मात्र इतर बँकांना हे नियम लागू होत नाही. त्यांनी अापल्या ग्राहकांना प़ूर्वीप्रमाणे कर्ज द्यायलाच हवे. शेतकऱ्यांना ‘नो ड्युज’ सर्टिफिकेट देऊन टाळणे योग्य नाही, असे बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

इतर ताज्या घडामोडी
संत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल...नागपूर  ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...
सूक्ष्म सिंचन विस्तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद   : औरंगाबाद येथे आयोजित...
‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे  ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...
आंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे  : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...
रोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...
लोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...
कृषी सल्ला (कोकण विभाग)भात रोप अवस्था : उन्हाळी भात रोपवाटिकेस...
थंडीच्या काळात केळी बागांची काळजीकेळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४...
पहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...
पाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू अकोला : शासनाच्या पाणंद रस्ते योजनेतून...
`साखर उद्योगातील संघटित गुन्हेगारी...मुंबई : गेल्या वर्षीच्या हंगामातील ७०-३०...
शासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळतीअकोला : येथील मूर्तिजापूर मार्गावर असलेल्या...
कृषी योजनेतील विहिरींनाही दुष्काळाचा...धुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशात विहिरींनी...
नागपुरात `जलयुक्‍त`चा निधी आटलानागपूर : फडणवीस सरकारची महत्त्वाकांशी योजना...
मराठवाड्याची ७६२ कोटींची अतिरिक्‍त...औरंगाबाद ः शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेच्या...
नत्राच्या कार्यक्षम वापरासाठी सेन्सरचा...कृषी क्षेत्रातून होणाऱ्या नत्रांच्या प्रदूषणाची...
कृषिक प्रदर्शनातील प्रात्यक्षिके पाहून...बारामती, जि. पुणे ः कृषिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या...
जाती-धर्माच्या भिंती तोडणे हीच स्व....इस्लामपूर, जि. सांगली : लोकनेते राजारामबापू पाटील...
पशुधन संख्येनुसार चारा उपलब्ध करून द्यापरभणी ः परभणी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पशुधन...
ज्वारी, हरभरा, करडईच्या पेरणी...परभणी ः जिल्ह्यात यंदा ज्वारी, हरभरा, करडई या तीन...