agriculture news in marathi, Awakening by Khandesh Association regarding bond larvae | Agrowon

बोंड अळीबाबत खानदेश असोसिएशनतर्फे जागृती
टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 जून 2018

जळगाव ः जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवड जवळपास आटोपली असून, आगामी हंगामात गुलाबी बोंड अळीचा प्रकोप कापूस पिकावर होऊ नये यासाठी खानदेश जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशनतर्फे पुस्तिका व मार्गदर्शन कार्यक्रमांद्वारे जनजागृती केली जात आहे.

जळगाव ः जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवड जवळपास आटोपली असून, आगामी हंगामात गुलाबी बोंड अळीचा प्रकोप कापूस पिकावर होऊ नये यासाठी खानदेश जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशनतर्फे पुस्तिका व मार्गदर्शन कार्यक्रमांद्वारे जनजागृती केली जात आहे.

मागील महिन्यात असोसिएशनने जागतिक कापूस तज्ज्ञ डॉ. सी. डी. मायी यांच्या मार्गदर्शन कार्यक्रमाचे बोदवड येथे आयोजन केले. त्यात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. आता प्रमुख गावे, शेतीशी संबंधित संस्थांमध्ये बोंड अळीला रोखण्याच्या उपायांबाबत माहिती असलेली पुस्तिका वितरित केली जात आहे. असोसिएशनचे सदस्य, असोसिएशनशी जुळलेले कापूस उत्पादक यांच्या माध्यमातून या पुस्तिका अधिकाधिक कापूस उत्पादकांपर्यंत पोचविण्याचे नियोजन केल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी दिली.

खानदेशात कापूस उत्पादक अधिक आहेत. मागील हंगाम गुलाबी बोंड अळीमुळे उद्ध्वस्त झाला. पुढे ही समस्या सोप्या पद्धतीने रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याची माहिती पुस्तिकेत आहे. त्यात पिकात पाते फुले लागत असतानाच कामगंध सापळे लावणे, एकाच वाणाची लागवड करणे, रेफ्युजची शेताच्या बाहेरच्या भागात कटाक्षाने लागवड करणे आदी मुद्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात कापूस लागवड अधिक असलेल्या भागावर जनजागृतीसाठी लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

इतर ताज्या घडामोडी
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...