agriculture news in marathi, Awarded 'Nashik Bhushan' to 'Vilas Shinde' | Agrowon

‘विलास शिंदे’ यांना ‘नाशिकभूषण’ पुरस्कार प्रदान
टीम अॅग्रोवन
रविवार, 24 जून 2018

नाशिक  : स्वातंत्र्यप्राप्तीपासून ते आजपर्यंत पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणी, वीज यांसारख्या पायाभूत सुविधांभोवती देशाची व्यवस्था फिरत आहे. शेती विकासासाठी राबविलेली कृषी विस्ताराची कार्य सध्या निरुपयोगी ठरत असल्याने ग्रामीण भागातील जीवनमान अधिकच बिकट होत चालले आहे. येत्या काळात शहरी आणि ग्रामीण विकासातील ही दरी कमी केली नाही, तर देशाला उद्ध्वस्त करण्यासाठी कुठल्याही परकीय शक्तीची गरज भासणार नाही, असा इशारा आदर्श ग्राव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्या दिला आहे. 

नाशिक  : स्वातंत्र्यप्राप्तीपासून ते आजपर्यंत पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणी, वीज यांसारख्या पायाभूत सुविधांभोवती देशाची व्यवस्था फिरत आहे. शेती विकासासाठी राबविलेली कृषी विस्ताराची कार्य सध्या निरुपयोगी ठरत असल्याने ग्रामीण भागातील जीवनमान अधिकच बिकट होत चालले आहे. येत्या काळात शहरी आणि ग्रामीण विकासातील ही दरी कमी केली नाही, तर देशाला उद्ध्वस्त करण्यासाठी कुठल्याही परकीय शक्तीची गरज भासणार नाही, असा इशारा आदर्श ग्राव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्या दिला आहे. 

रोटरी कल्ब ऑफ नाशिकतर्फे दिल्या जाणाऱ्या ‘नाशिक भूषण पुरस्कार’ वितरण प्रसंगी ते बोलत होते. सह्याद्री फार्मर्स प्राड्यूसर्सचे संचालक व प्रगतिशील शेतकरी विलास शिंदे यांना हा पुरस्कार प्रदाण करण्यात आला. व्यासपीठावर माजी मंत्री विनायकदादा पाटील, रोटरी क्‍लबचे अध्यक्ष दिलीप सिंह बेनिवाल, श्रीनंदन भालेराव, मनीष चिंधडे आदी उपस्थित होते.

पोपटराव पवार म्हणाले, की गेल्या ७० वर्षांत विकासाच्या नावाखाली निसर्गाशी प्रचंड दुरावा निर्माण झाला आहे. शहरीकरणाच्या नादात ग्रामीण भागाकडे विशेषता: कृषी विकासात आवश्यक प्रगती झाली नाही. त्यामुळे ग्रामीण अर्थ व्यवस्था खिळखिळी झाली आहे. 

आजही शेतकऱ्यांची बियाण्यांमध्ये फसवणूक होते. पीक नियोजन, भूजल व्यवस्थापन, पाण्याचे पुनर्भरण, शेती पिकांचे विक्री व्यवस्थापन आदी बाबतीत मोठ्या प्रमाणावर काम करावे लागणार आहे. त्यातूचनच ग्रामीण अर्थ व्यवस्था बळकट होऊ शकते. विलास शिंदे यांनी कृषी क्षेत्रात केलेले कार्य देशासाठी पथदर्शी असून, नाशिकने देशाच्या कृषी क्षेत्राला दिशा देण्याचे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.  शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. प्रस्ताविक रोटरीचे अध्यक्ष दिलीप सिंह बेनी यांनी केले. सूत्रसंचालन स्वाती मराठे यांनी केले.

इतर ताज्या घडामोडी
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...