एकजूट दाखविली तरच कामगारांना न्याय

एकजूट दाखविली तरच कामगारांना न्याय
एकजूट दाखविली तरच कामगारांना न्याय

असंघटित कष्टकऱ्यांची पेन्शन परिषद आणि हमाल मापाडींचे द्वैवार्षिक अधिवेशन बीड : शेतकरी फासावर चढून मरतोय अन् जवान सीमेवर गोळ्या खात असताना सरकारला काहीही फरक पडत नाही. कामगारांमध्ये फूट पाडण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी केला. सरकारला मूलभूत प्रश्नांचा विसर पडला असून, ते संविधान मोडायला निघालेत, असा आरोपही त्यांनी केला. असंघटित कष्टकऱ्यांची पेन्शन परिषद आणि हमाल मापाडींच्या २० व्या द्वैवार्षिक अधिवेशनास शनिवारी (ता. २५) बीडमध्ये सुरवात झाली. खासदार डॉ. प्रीतम मुंडे, स्वागताध्यक्ष आमदार जयदत्त क्षीरसागर, माजी आमदार उषा दराडे, बापूसाहेब मकदूम, समाजवादी नेते प्रा. सुभाष वारे, हरीश धुवड, सुभाष लोमटे, अविनाश घुले, सभापती दिनकर कदम, गणपत डोईफोडे, हमाल मापाडी महामंडळाचे राजकुमार घायाळ उपस्थित होते.   डॉ. आढाव म्हणाले, की शेतीमालाला भाव मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळ्या झाडल्या जात आहेत. कांद्याचा भाव वाढला की परदेशातून आयात केला जातो. शेतकऱ्यांच्या मालाला भाव आणि कष्टकऱ्यांच्या घामाला दाम सरकार देणार की नाही. बाजार समित्यांमध्ये हमालांसाठीच्या कायद्यांची पायमल्ली होत आहे. जीएसटी, नोटाबंदीमुळे व्यवहार मंदावले आहेत. शेतकरी, ऊसतोड मजूर व असंघटित क्षेत्रात कार्यरत कामगारांना पेन्शन, हमीभाव व कर्जमाफी मिळाली पाहिजे. कर्जमाफी व कामगारांच्या प्रश्नांवर दिलेली आश्वासने सरकारने पाळली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. खासदार डॉ. प्रीतम मुंडे म्हणाल्या, की कामगार, शेतकरी यांच्या प्रश्नांबाबत सरकार संवेदनशील आहे. पेन्शनचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण दिल्लीत पाठपुरावा करू. जयदत्त क्षीरसागर म्हणाले, की असंघटित कामगार, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपण नेहमीच पुढाकार घेतला असून अधिवेशनाच्या निमित्ताने समोर आलेले प्रश्न तडीस लावण्यासाठी प्रयत्न करू. तत्पूर्वी कामगारांची फेरी निघाली. महापुरुषांचे प्रतिमा पूजन करून मशाल प्रज्वलीत करण्यात आली. त्यानंतर वृक्षांना पाणी घालण्यात आले. ज्येष्ठ हमाल व कामगारांसह दुरून आलेल्या हमाल प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com