agriculture news in marathi, Baba Adhav warns on Mathadi Mandals issue | Agrowon

माथाडी मंडळे बंद करणे हा आत्मघाती प्रकार
टीम अॅग्रोवन
रविवार, 21 जानेवारी 2018

 पुणे : असंघटित कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, या कामगारांसाठी असणारी राज्यातील ३६ माथाडी मंडळे बंद करून शासन कायदा गुंडाळण्याचा प्रयत्न हा आत्मघाती प्रकार आहे. याला आमचा विराेध असून, २३ जानेवारीच्या कामगारांच्या मेळाव्यात शासनाच्या निर्णयाविराेधात आंदाेलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी शनिवारी (ता.२०) पत्रकार परिषदेमध्ये दिली. 

 पुणे : असंघटित कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, या कामगारांसाठी असणारी राज्यातील ३६ माथाडी मंडळे बंद करून शासन कायदा गुंडाळण्याचा प्रयत्न हा आत्मघाती प्रकार आहे. याला आमचा विराेध असून, २३ जानेवारीच्या कामगारांच्या मेळाव्यात शासनाच्या निर्णयाविराेधात आंदाेलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी शनिवारी (ता.२०) पत्रकार परिषदेमध्ये दिली. 

या वेळी बाेलताना डॉ. आढाव म्हणाले, ‘‘राज्यस्तरावर एकच माथाडी मंडळ स्थापन करण्यासाठी सरकारने १७ जानेवारी शासन निर्णयाद्वारे समिती स्थापन केली. या समितीला तातडीने ३१ जानेवारीअखेर अहवाल सादर करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र या समितीमध्ये कामगार संघटनांच्या एकाही सदस्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही. यामुळे हे सरकार माथाडी कायदा गुंडाळायला निघाले अाहे. याला आमचा विराेध आहे. असंघटित कामगारांना एकत्र आणत त्यांच्यासाठी १६६९ मध्ये कायदा बनविण्यात आला. हा कायदा बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये मी हाेताे. हा कायदा विविध राज्यांनी स्वीकारला असताना, राज्य शासनाच्या वतीने हा कायदा माेडित काढण्याचा डाव करण्यात येत आहे. हे कामगारांच्या विराेधात आहे.’’

राज्यातील ३६ माथाडी मंडळे स्वायत्त असून, कामगारांच्या वेतनाचा काेणताही बाेजा सरकारवर नाही. असे असताना केवळ कामगार संघटना माेडित काढण्यासाठी प्रक्रिया निंदनीय आहे. सध्या पुणे माथाडी मंडळाकडे २०० काेटींपेक्षा, तर मुंबई माथाडी मंडळाकडे ५ हजार काेटींपेक्षा अधिकच्या ठेवी आहेत. असे असताना एकच मंडळ स्थापन करणे हे कामगारविराेधी असून, याच्याविराेधात आंदाेलन उभारण्यात येणार आहे. याचा निर्णय २३ जानेवारीच्या मेळाव्यात घेतला जाईल असेही डॉ. आढाव यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला पदाधिकारी संताेष नांगरे, राजेंद्र चाेरघे, हनमंत बहिरट आदी उपस्थित हाेते. 

२६ ला रॅली
कामगार व अंगमेहनती कष्टकऱ्यांच्या विराेधातील धाेरणांचा निषेध आणि संविधान बचाव रॅलीसाठी २६ जानेवारी राेजी डॉ. बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली पुणे-मुंबई दुचाकी रॅली काढण्यात येणार असल्याचेही कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी संताेष नांगरे यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...
नगर जिल्ह्यातील १२८ गावांत दूषित पाणीनगर  : ‘सर्वांना शुद्ध पाणी’ यासाठी सरकार...
आमच्या काळात एकही घोटाळा नाही :...सोलापूर : काँग्रेस आघाडी देशाला मजबूत करू...
सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी...सातारा : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ...
बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम...सावकाश उपलब्ध होण्याच्या क्षमतेमुळे कॅल्शियम...
जल, मृद्‌संधारणासाठी पूर्वमशागत...जमिनीमध्ये चांगले पीक उत्पादन येण्याकरिता भौतिक,...
कृषी सल्ला : भुईमूग, आंबा पीक भुईमूग शेंगा अवस्था भुईमूग पीक आऱ्या...