agriculture news in marathi, bacchu kadu to lead agri supervisor issue | Agrowon

कीड-रोग सर्वेक्षकांच्या लढ्यात बच्चू कडू उतरले
टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 एप्रिल 2018

पुणे : राज्यातील १२०० कीड-रोग सर्वेक्षकांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या लढ्यात आता आ. बच्चू कडू यांनीदेखील उडी घेतली आहे. महाराष्ट्र राज्य तांत्रिक कृषी कीडरोग सर्वेक्षक संघटनेने मंत्रालयासमोर २ मे रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पुणे : राज्यातील १२०० कीड-रोग सर्वेक्षकांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या लढ्यात आता आ. बच्चू कडू यांनीदेखील उडी घेतली आहे. महाराष्ट्र राज्य तांत्रिक कृषी कीडरोग सर्वेक्षक संघटनेने मंत्रालयासमोर २ मे रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

‘क्रॉपसॅप’ अर्थात ‘कीडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प’ केंद्र सरकारच्या पातळीवर चर्चेचा ठरला होता. प्रकल्प केवळ ठेकेदारांचे खिसे भरण्याचा प्रकार आहे, असा आरोप सर्वेक्षकांनी केला आहे. सर्वेक्षकांनी दोन वर्षांसाठी विधिमंडळावर मोर्चा काढला असता कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सर्वेक्षकांच्या मागण्या मान्य केल्या, मात्र केले काहीच नाही. आ. कडू यांनी आता कृषिमंत्र्यांना पत्र पाठवून सर्वेक्षक संघटनेचे अध्यक्ष यशवंत शेंडगे यांना पाठिंबा दिला आहे. सर्वेक्षकांनी विविध आंदोलने छेडली आहेत. आता ते आत्मत्याग आंदोलनाच्या तयारीत आहेत. त्यामुळे याबाबत कृषी विभागाने १ मे रोजी तातडीची बैठक आयोजित करावी, अशी लेखी मागणी आ. कडू यांनी केली आहे. तथापि, या मागणीला कृषी विभागाने केराची टोपली दाखविली आहे. 

दुसऱ्या बाजूला लातूरच्या कृषी सहसंचालकांनी ठेकेदारांची चौकशी करण्याचे सोडून महाराष्ट्र राज्य तांत्रिक कृषी कीडरोग सर्वेक्षक संघटनेचे अध्यक्ष शेंडगे यांच्याविरोधात कामचुकारपणाचा अहवाल पाठविला आहे. भ्रष्टाचाराच्या दलदलीत फसलेल्या कृषी विभागाने शेतकऱ्यांची मुले असलेल्या कीडरोग सर्वेक्षकांच्या समस्यांकडे आस्थेने पाहावे. ठेकेदार सोडून आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न केल्यास सर्वेक्षक स्वस्थ बसणार नाहीत, असा इशारा श्री. शेंडगे यांनी दिला आहे.

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...