मंत्री जानकर यांची दूध दरवाढीत एजंटशिप : बच्चू कडू

भाजपला कोणत्या गुरुजींनी हे गणित शिकवले हे शोधले पाहिजे. त्यांचे गणित फेकू आहे. दीडपट सांगून दहा टक्केसुद्धा दर वाढवायचे, त्यातही दोनशे रुपये कमी करायचे, असे होत आहे. गेल्या वर्षी हमीभावापेक्षा कमी भावाने माल घेतल्यास फौजदारी करू म्हणणारे मुख्यमंत्री यावर्षी कुठेही शेतीमाल विक्री करा, एक हजार रुपये देतो, असे सांगत आहेत. - बच्चू कडू, आमदार.
बच्चू कडू
बच्चू कडू

कऱ्हाड, जि. सातारा : दुग्ध विकास व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी दूध दरवाढीत एजंटशिप केली असून शेतकरी कमिशन देणार नसल्यामुळेच शेतकऱ्यांना थेट अनुदान दिले गेले नाही, असा आरोप प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी केला.

आमदार कडू शुक्रवारी (ता. १३) कऱ्हाड येथील शासकीय विश्रामगृहात आले होते, त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बळिराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील, ‘प्रहार’चे जिल्हाध्यक्ष अजित बानुगडे आदी उपस्थित होते.

या वेळी आमदार कडू म्हणाले, की दूध भुकटीची निर्यात झाल्यास त्यासाठी जास्त दूध खरेदी होईल. तसे झाल्यास दुधाचे दर वाढतील, असे मंत्री जानकर यांचे म्हणणे आहे. तीन रुपये दरवाढीत त्यांची खेळी असून एक रुपया आम्हाला, दोन रुपये तुम्हाला कमिशन ठेवा, हेच दिसते. भुकटीला पैसे देण्यापेक्षा शेतकऱ्यांना प्रती लिटर दुधाचे पैसे द्यावेत किंवा शासनाकडून दुधाळ जनावरांच्या होणाऱ्या सर्व्हेनुसार पैसे द्यावेत, ही मागणी आहे. कंपनी, खासगी कारखाने किंवा संस्थेला दूध भुकटीसाठी अनुदान देण्यापेक्षा शेतकऱ्यांना थेट अनुदान द्यावे, दुधाळ जनावरांना अनुदान द्यावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com