agriculture news in marathi, bacchu kadu will start orange process unit, amravati, maharashtra | Agrowon

आमदार बच्चू कडू उभारणार संत्रा प्रक्रिया उद्योग
टीम अॅग्रोवन
शनिवार, 12 जानेवारी 2019

संत्रा लागवड क्षेत्र मोठे असूनही याच भागात त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगाचा अभाव आहे. त्यामुळे हंगामात संत्रा उत्पादकांना अपेक्षित पैसे मिळत नाहीत. त्यामुळेच संत्रा प्रक्रिया उद्योग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. २५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पात ज्यूस, पल्प आणि इतर उपपदार्थ तयार करण्यावर भर दिला जाईल.

- बच्चू कडू, आमदार.

अमरावती : संत्रा उत्पादकांना चांगला दर मिळावा याकरिता त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगाची गरज आहे. ही गरज ओळखत ‘प्रहार’चे संस्थापक व आमदार बच्चू कडू हेच अशा प्रकल्पाकरिता पुढाकार घेणार आहेत. भूगाव येथे २०० हेक्‍टरवरील एमआयडीसीला विशेष मान्यता देण्यात आली आहे. याच परिसरात हा प्रकल्प उभारला जाणार आहे. 

विदर्भात सुमारे एक लाख हेक्‍टरवर संत्रा लागवड आहे. प्रक्रिया उद्योगाचा अभाव त्यासोबतच निर्यातक्षम वाणाच्या अनुषंगाने संशोधन न होणे या कारणामुळे चव आणि रंगाच्या बाबतीत वेगळेपण जपणारा नागपूरी संत्रा पंजाबमधील किन्नोशी स्पर्धेत पिछाडीवर आहे. दराच्या बाबतीतही मोठे चढउतार उत्पादकांनी गेल्या काही वर्षात अनुभवले. ही बाब लक्षात घेत संत्र्यावर आधारीत प्रक्रिया उद्योगाची गरज व्यक्‍त होत होती. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारच्या काळात चुरी (छोट्या) आकाराच्या संत्र्यावरील प्रक्रिया उद्योगाला मान्यता देण्यात आली. परंतू हा  प्रकल्प नंतर नांदेडला नेण्यात आला. 

विदर्भात एक लाख हेक्‍टरवर संत्रा असताना या भागात सद्यःस्थितीत एकही प्रक्रिया उद्योग नाही. ही बाब लक्षात घेत आमदार बच्चू कडू यांनी सुमारे २५ कोटी रुपयांचा संत्र्यावर आधारीत प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अचलपूर तालुक्‍यातील भूगाव येथे नुकतीच २०० हेक्‍टरवर एमआयडीसीला मान्यता मिळाली आहे. याच परिसरात हा  प्रकल्प उभारला जाणार आहे. निधी संदर्भाने मुंबईतील एका बॅंकेशी देखील चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले. 
 

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...