agriculture news in marathi, bad effect of heat on crops, varhad, maharashtra | Agrowon

वऱ्हाडात पिकांना वाढती उष्णता सोसवेना
टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

मागील अनेक दिवसांपासून पाऊस नसल्याने सर्वच पिके करपून जात आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर या हंगामात पिकांवर केलेला खर्चसुद्धा भरून निघेल असे वाटत नाही.
- श्रीकृष्ण जुनारे, शेतकरी, शेंबा बुद्रुक, जि. बुलडाणा

अकोला  ः गेल्या अाठ दिवसांपासून कमाल तापमानात अचानक वाढ झाली असून, हे उष्णतामान पिकांना मानवत नसल्याचे समोर अाले अाहे. पावसाचा २० दिवसांपेक्षा अधिक काळ खंड पडल्याने व तापमान वाढल्याने सर्वच पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली अाहे.  

वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांमध्ये गेल्या २० दिवसांपासून पाऊस गायब झालेला अाहे. सुरवातीला अकोला व वाशीम जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला. बुलडाणा जिल्ह्यात जेमतेम पाऊस झालेला अाहे. सध्या कुठेही पाऊस नसल्याने व त्यातच दिवसाचे कमाल तापमान अचानक वाढल्याने पिकांची काहिली होत अाहे. अाजवर टिकून असलेली अार्द्रता या तापमानामुळे झपाट्याने कमी होत अाहे.  याचा परिणाम खरिपातील सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी पिकांवर होऊ लागला.

बऱ्याच ठिकाणी सोयाबीनचे पीक पिवळे पडणे, शेंगा लागलेल्या असून, त्यात दाणे भरण्याची प्रक्रीया संथगतीने होणे, कपाशीमध्ये फूल-पाती गळ होत अाहे. भाजीपाला, फळबागांनाही पाण्याची नितांत गरज अाहे. अशातच वीज भारनियमनाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत अाहे. वीज रोहित्रांचे प्रश्न गंभीर झाले अाहेत.

तापमान वाढल्याने दुपारी सर्वच पिके सुकत असल्याचे दिसून येते. पावसाच्या खंडाचे दिवस वाढल्यास उत्पादनाला थेट फटका बसण्याची भीती व्यक्त होत अाहे. प्रामुख्याने याचा पहिला परिणाम सोयाबीन उत्पादनाला बसण्याची लक्षणे दिसून येत अाहेत.  
 

इतर ताज्या घडामोडी
ढगाळ वातावरण, भुरीच्या धोक्याकडे लक्ष...बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वादळाचा परिणाम...
पीकविम्याच्या हप्त्याची वेळ अत्यंत...हवामानातील विविध घटकांमुळे पिकांचे अनेक वेळा...
खानदेशात रब्बीचे ७९ टक्के क्षेत्र नापेरजळगाव :खानदेशात रब्बी पिकांमध्ये मका, गव्हाची...
फरदड कपाशीचे उत्पादन टाळावे ः कुलगुरू...नांदेड ः आगामी खरीप हंगामामध्ये कपाशीवर गुलाबी...
पायाभूत सुविधांअभावी रेशीम उत्पादक...बीड : रेशीम कोष उत्पादन वाढीसाठी महारेशीम अभियान...
‘एफआरपी’ थकविलेल्या कारखान्यांना दणकाकोल्हापूर : हंगाम सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी...
अकोल्यात ‘अात्मा’ शेतकरी सल्लागार...अकोला ः शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोचवण्‍...
भंडारा जिल्ह्यातील भूजल पातळी खोलभंडारा : जिल्ह्यात सामान्य पर्जन्यमानाच्या...
साताऱ्यात गवार प्रतिदहा किलो ३०० ते ४५०...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
पाच मिनिटांत १२० कोटींच्या नियोजनास...जळगाव : समान निधी वाटपाच्या मुद्यावरून गेल्या...
नवेगावबांधमध्ये पावसाने शेकडो क्विंटल...नवेगावबांध, जि. गोंदिया : येथील शासकीय...
अधिस्वीकृती समितीच्या बैठकीकडे माफसूचे...नागपूर   ः राज्यातील काही कृषी...
सामूहिक शेततळ्यांसाठी पुणे जिल्ह्यातील...पुणे  : वाढत्या पाणीटंचाईमुळे शेतकरी...
...ही परिवर्तनाची सुरवात आहे : शरद पवारमुंबई   : देशाच्या संविधानावर, स्वायत्त...
नगर जिल्ह्यात नरेगा कामांवर ६७७६ मजूर...नगर  ः दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन...
सातारा जिल्ह्यात १३३५ शेततळी पूर्ण सातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
भाजपत दोघांचीच मनमानी : यशवंत सिन्हापुणे : सध्या लोकशाही धोक्यात आणणा-या भाजपची घमेंड...
सरकार स्थापनेनंतर लगेचच शेतकऱ्यांना...नवी दिल्ली : छत्तीसगड, राजस्थानमध्ये कॉंग्रेसचे...
शाश्वत भविष्यासाठी अन्न पद्धतीमध्ये...सन २०५० पर्यंत जगाची लोकसंख्या सुमारे १० अब्ज...
परभणीत प्रतिटन २२०० रुपये ऊसदरासाठी ‘...परभणी ः गंगाखेड शुगर्स साखर कारखान्याने गेल्या...