agriculture news in marathi, Bail pola alias pongal to celebrate in maharashtra today | Agrowon

बैल आभाळाची कृपा, बैल घामाची प्रतिमा, बैल श्रमाचे प्रतीक।
विवेक मेतकर
रविवार, 9 सप्टेंबर 2018

अकोला, ः
बैल आभाळाची कृपा, बैल धरतीचा जप।
काळ्या मातीची पुण्याई, बैल फळलेले तप।।
बैल घामाची प्रतिमा, बैल श्रमाचे प्रतीक।
बैल माझ्या शिवारात, काढी हिरवे स्वस्तिक।।

ज्येष्ठ वऱ्हाडी कवी विठ्ठल वाघ यांचा ‘वृषभसूक्त’ नावाचा कवितासंग्रह... विलक्षण अशा ‘भूदेव’ शब्दांत त्यांनी बैलाचे वर्णन केले. अशा बैलाच्या श्रमावरच आपली संस्कृती उभी आहे. या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वर्षातला एक दिवस त्याच्यासाठी राखून ठेवलेला सण म्हणजे ‘पोळा’.

अकोला, ः
बैल आभाळाची कृपा, बैल धरतीचा जप।
काळ्या मातीची पुण्याई, बैल फळलेले तप।।
बैल घामाची प्रतिमा, बैल श्रमाचे प्रतीक।
बैल माझ्या शिवारात, काढी हिरवे स्वस्तिक।।

ज्येष्ठ वऱ्हाडी कवी विठ्ठल वाघ यांचा ‘वृषभसूक्त’ नावाचा कवितासंग्रह... विलक्षण अशा ‘भूदेव’ शब्दांत त्यांनी बैलाचे वर्णन केले. अशा बैलाच्या श्रमावरच आपली संस्कृती उभी आहे. या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वर्षातला एक दिवस त्याच्यासाठी राखून ठेवलेला सण म्हणजे ‘पोळा’.

नांगर-बैल-माणूस यांच्या त्रिवेणी संगमातून मोठया प्रमाणात धान्याचे उत्पादन व्हायला लागले. अन्नासाठी वणवण फिरायची गरज राहिली नाही. खऱ्या अर्थाने इथून मानवी संस्कृती स्थिर झाली. पोटाची आग विझल्यावर कला, संगीत व इतर बाबी बहरत गेल्या. माणसाला विचार करायला सवड मिळाली. पोटाची भूक मिटवल्यामुळे मेंदूची वाढ सुरू झाली. याला मुख्य कारणीभूत ठरला तो वृषभ म्हणजेच बैल.

संस्कृतीला कलाटणी
शिकार करून जगणारा माणूस शेती करायला लागला. मारून खाणारा आता पेरून खायला लागला आणि इथूनच मानवी संस्कृतीची सुरवात झाली, असे मानण्यात येते. माणसाला पुढे नांगराचा शोध लागला, या नांगराला ओढण्यासाठी बैलाचा उपयोग होऊ शकतो, हे लक्षात आले आणि मानवी संस्कृतीला एक मोठी कलाटणी मिळाली.

यांत्रिकीकरणाचे पहिले प्रतीक
पाच हजार वर्षांपूर्वीच्या ॠग्वेदात ‘कृषी सूक्त’ उल्लेखानुसार बैल-नांगर-माणूस हे यांत्रिकीकरणाचे पहिले प्रतीक. निसर्गाचा विनाश न करता माणसाने केलेला पहिला व्यवसाय म्हणजे शेती. ॠग्वेदात गायीचे जे गोडवे गायले जातात, त्याला इतर कारणांबरोबरच ती शेतीसाठी बैल देते म्हणूनही शेती करणाऱ्या समाजाला तिचे कौतुक राहिलेले आहे.

साहित्यातील वृषभ
माझ्या वासराने हुंगुनिया माती, जुवाच्या जोत्याला भिडविली छाती
माझ्या वासराने हुंगले आभाळ, आणि धरणीही कापे चळचळ
‘दूर राहिला गाव’ इंद्रजीत भालेराव यांच्या कवितासंग्रहात वासराचा बैल होण्याची प्रक्रिया फार सुरेख पध्दतीने आली आहे.
गायीच्या पोटी आलेले वासरू छोटा गुराखी मन लावून सांभाळतो. त्याला मोठे करतो. हे घरचे वासरू शेतात काम करण्याजोगते झाले की त्याला मनापासून आनंद होतो. त्याच्यासोबत हा मोठा झालेला शेतकरीही राबतो. दोघांच्या श्रमाला निसर्गाची साथ मिळाली, तर घरात लक्ष्मी येते, अशी सगळ्या शेतकरी समाजाची श्रध्दा आहे.

इतर अॅग्रो विशेष
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...
वाघाड पाणीवापर संस्थांनी शेतीतून उभारले...नाशिक जिल्ह्यात वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर...
कम पानी, मोअर पानी देणारे डाॅ. वने...नगर जिल्ह्यातील मानोरी येथील कृषिभूषण डॉ....
आसूद : पाणी वितरणाचे अनोखे मॉडेलरत्नागिरी जिल्ह्यात दापोली-हर्णे रस्त्यावर दोन...
विकासाची गंगा आली रे अंगणी...खानदेशात जळगाव, जामनेर व भुसावळ या तालुक्‍यांच्या...
मराठवाड्यात सिंचनातले सर्वोच्च...परभणी जिल्ह्यात वरपूड येथील चंद्रकांत अंबादासराव...
होय, कमी पाण्यात विक्रमी ऊस !सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी येथील प्रयोगशील ऊस...
राज्यात नीचांकी हरभरा खरेदीमुंबई : राज्यातील हरभरा उत्पादक...
सीमेवरील तणावाचा केळी निर्यातीला फटकारावेर, जि. जळगाव : जम्मू-काश्मीर नियंत्रण रेषेजवळ...
ॲग्रोवनच्या ‘मराठवाड्यातलं इस्त्राईल :...जालना : कष्ट उपसणारी पहिली पिढी, पीक बदलातून...