‘बळिराजाचा सारथी’ मोबाईल अॅप तयार

अकोला ः ‘बळिराजाचा सारथी’ मोबाईल अॅप तयार करण्यासाठी पुढाकार घेणारे राजेश खवले व इतरांचा महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सत्कार केला.
अकोला ः ‘बळिराजाचा सारथी’ मोबाईल अॅप तयार करण्यासाठी पुढाकार घेणारे राजेश खवले व इतरांचा महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सत्कार केला.
अकोला ः फेरफार, रस्‍ता, हक्‍कसोड लेख, अधिकार अभिलेख, वारस, शेतरस्‍ता, अकृषक, न्‍याय विषयक, कूळ कायदा, मृत्‍युपत्र, तुकडा बंदी यापैकी कुठलीही माहिती हवी असेल तर मोबाईल अॅप मदत करू शकते. अकोला जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत बळिराजाचा सारथी नावाचे मोबाईल अॅप तयार केले आहे. 
 
या अॅपचे रविवारी (ता. ३) राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते विमोचन झाले. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनात मोबाईल ॲप आणि निर्दोष सातबारा संगणकीकरण पुरावा पुस्तिका प्रशासनाने तयार केली आहे.
 
जिल्हा नियोजन सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार प्रकाश भारसाकळे, गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, आकाश फुंडकर, महापौर विजय अग्रवाल, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी राजेश खवले आदी उपस्थित होते.
 
या वेळी बळिराजाचा सारथी मोबाईल ॲप तयार करण्यासाठी परिश्रम घेणारे उपजिल्हाधिकारी राजेश खवले, एनआयसीचे अधिकारी अनिल चिंचोले, तहसीलदार राहुल तायडे आदींसह श्यामला खोत, प्रकाश अंधारे, प्रसाद रानडे, हितेश राऊत, अतुल गोमासे, योगेश गोमासे आदींचा श्री. पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. सातबारा निर्दोष राहण्यासाठी पंधरा प्रकारच्‍या पुराव्‍याची संचिका बनवण्‍यात आली. 
असे आहे ‘बळिराजाचा सारथी’ मोबाईल अॅप
शेतकऱ्यांना पडणाऱ्या विविध प्रश्‍नांची उत्तरे या अॅपच्‍या माध्‍यमातून मिळतील. फेरफार, रस्‍ता, हक्‍कसोड लेख, अधिकार अभिलेख, वारस, शेत रस्‍ता, अकृषक, न्‍यायविषयक, कूळ कायदा, मृत्‍युपत्र, तुकडाबंदी अशा विविध प्रश्‍नांना उत्तरे देण्‍यात आली आहे. उत्तरे अक्षरांच्‍या स्‍वरूपात वाचायला मिळतील. त्‍याचबरोबर आवाजी स्‍वरूपात ऐकता येतात.
 
अशिक्षित व्‍यक्‍ती, अंध व्‍यक्‍तीदेखील या अॅपद्वारे आपल्‍या प्रश्‍नांची उत्तरे ऐकू शकणार आहे. सुरवातीला मोजके प्रश्‍न घेऊन अॅपची निर्मिती करण्‍यात आलेली आहे. यापुढे अधिकाधिक प्रश्‍न व त्‍यांची उत्तरे या अॅपमध्‍ये समाविष्ट करण्‍यात येणार आहे. सामान्‍य शेतकऱ्याला समजेल अशी सुबोध आणि सुगम भाषा या अॅपमध्‍ये वापरण्‍यात आली आहे. यामुळे आता छोट्या प्रश्‍नांकरिता सल्‍ला घेण्‍याकरिता तज्ज्ञांकडे गरज राहणार नाही. शेतकऱ्याला त्‍यांच्‍या हक्‍काची जाणीव या अॅपद्वारे होणार आहे.
 
महसूल कायदे आणि महसुली अभिलेख यांच्‍याविषयी जागरुककता निर्माण करण्‍याचे काम या अॅपच्‍या माध्‍यमातून होणार आहे. भविष्‍यात शेतीविषयक विविध प्रश्‍नांची उत्तरे या अॅपच्‍या माध्‍यमातून दिली जाऊ शकणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com