agriculture news in marathi, ballworm crises, Farmers on hunger strikes in murtijapur | Agrowon

बोंड अळी-कापूस नुकसानप्रश्नी मूर्तिजापूर बंद
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 30 नोव्हेंबर 2017

अकोला ः कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले अाहे. याप्रश्नी लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे गेल्या तीन दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू असून, काही उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली अाहे. या अांदोलनाच्या समर्थनार्थ गुरुवारी (ता. ३०) मूर्तिजापूरमध्ये बंद पाळण्यात अाला. याशिवाय शिवसेना कार्यकर्त्यांनी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. 

अकोला ः कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले अाहे. याप्रश्नी लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे गेल्या तीन दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू असून, काही उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली अाहे. या अांदोलनाच्या समर्थनार्थ गुरुवारी (ता. ३०) मूर्तिजापूरमध्ये बंद पाळण्यात अाला. याशिवाय शिवसेना कार्यकर्त्यांनी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. 

जिल्ह्यात बोंड अळीमुळे कपाशीच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले अाहे. याप्रश्नी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी २८ नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले. बुधवारी (ता. २९) जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी भेट देऊ उपोषण मागे घेण्याबाबत अांदोलकांना विनंतीही केली; मात्र अांदोलक अापल्या मागण्यांवर ठाम राहिले. त्यांनी शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी, तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केला जावा अादी मागण्या मान्य होईपर्यंत अांदोलन सुरू ठेवण्याबाबत सांगितले. 

शिवसेनेचा उपविभागीय कार्यालयावर मोर्चा 

गुरुवारी या अांदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेच्या पुढाकाराने मूर्तिजापूर शहर बंद ठेवण्यात अाले. बंदचा नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये, म्हणून अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात अाली होती. बंदमध्ये व्यावसायिक प्रतिष्ठाने मात्र पूर्णवेळ बंद होती. 

बोंड अळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळावी व बीटी बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करत शहरातील शिवाजी चौकात येथे शिवसेना तालुकाप्रमुख अप्पू तिडके यांच्या नेतृत्वात बेमुदत उपोषण सुरू आहे. या ठिकाणापासून उपविभागीय कार्यालयावर मोर्चा नेण्यात अाला. उपविभागीय अधिकारी भागवत सैदांणे यांना निवेदन देण्यात अाले. ठाणेदार नितीन पाटील यांनी बंददरम्यान चोख बंदोबस्त ठेवला होता. 

 

इतर अॅग्रो विशेष
आरोग्यदायी आहार हेच हवे लक्ष्य!पहिले आणि दुसरे महायुद्ध संपले, यामध्ये...
तापलेलं ‘दूध’अनिश्‍चित अशा शेतीला शाश्वत मिळकतीची जोड म्हणून...
खडकवासला, कलमोडी धरण भरलेपुणे  : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने...
दुधाचा भडका; सरकारची कोंडी पुणे  : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या...
दुधाचे टँकर बंदोबस्तात मुंबईकडे रवानानाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात...पुणे: कोकण, मध्य महाराष्ट्राला सोमवारी (ता. १६)...
दूध आंदोलनाचे विधिमंडळातही पडसादनागपूर: दुधाला लिटरमागे प्रतिलिटर पाच रुपये...
बाजारपेठ ओळखून केळी बागेचे आदर्श नियोजनकठोरा (ता. जि. जळगाव) येथील पांडुरंग मोहन पाटील व...
एकात्मीक शेतीतून खुल्या झाल्या...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिह्यातील...
दूधदर प्रश्नी विधिमंडळ दणाणले; सभेत...नागपूर : राज्यात सुरु असलेल्या दूध दर आंदोलनाचे...
दूध आंदोलन तापले, बहुतांश जिल्ह्यात...पुणे : शेतकऱ्यांना प्रति लिटर थेट पाच रुपये...
कोल्हापूरात दूध संकलन १०० टक्के बंद ! कोल्हापूर- गायीच्या दूधाला प्रतिलिटर पाच...
आंतरराष्ट्रीय सुबाभूळ परिषदेच्या...पोषण हा पशुपालनातील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे....
चिंब झाली रान माती...कमी पाऊसमानानंतर उद्भवणारी पाणीटंचाई आणि दुष्काळी...
आंदोलन होणारचकोल्हापूर/ पुणे : अनेक दूध संघ अगोदरच गायीच्या...
काेकण, विदर्भात तुरळक ठिकाणी...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र...
साखर कारखान्यांकडे १२ हजार कोटींची...लखनौ ः उत्तर प्रदेशात २०१७-१८ च्या हंगामात...
संघांकडून दूध दरात तीन रुपयांची वाढपुणे ः दूध दरावर ताेडगा काढण्यासाठी राज्य सरकारने...
पीककर्ज वितरण केवळ ३० टक्केचपुणे : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपात दिरंगाई...
सेंद्रिय भातशेतीसोबतच राबविली थेट...पुणे जिल्ह्यातील भोयरे (ता. मावळ) येथील रोहिदास...