agriculture news in marathi, ballworm outbreak due to government's ignorance | Agrowon

शासनकर्त्यांच्या दुर्लक्षामुळेच बोंड अळीचा उद्रेक : कृषिमंत्री
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

अकोला : देशात बीटी कपाशीचा वापर सुरू झाल्यानंतर आयसीअायअारने शासनाला बोंड अळीबाबत वेळोवेळी अवगत केले. परंतु याकडे दुर्लक्ष केल्याने बोंड अळीच्या प्रादुर्भावाची यंदा भीषण परिस्थिती निर्माण झाली, अशी खंत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर व्यक्त केली.

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या ११९व्या जयंतीनिमित्त कृषीविद्यापिठात अायोजित ॲग्रोटेक २०१७ या प्रदर्शनाचे उद्‌घाटक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. विलास भाले होते.

अकोला : देशात बीटी कपाशीचा वापर सुरू झाल्यानंतर आयसीअायअारने शासनाला बोंड अळीबाबत वेळोवेळी अवगत केले. परंतु याकडे दुर्लक्ष केल्याने बोंड अळीच्या प्रादुर्भावाची यंदा भीषण परिस्थिती निर्माण झाली, अशी खंत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर व्यक्त केली.

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या ११९व्या जयंतीनिमित्त कृषीविद्यापिठात अायोजित ॲग्रोटेक २०१७ या प्रदर्शनाचे उद्‌घाटक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. विलास भाले होते.

या वेळी कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, अामदार गोवर्धन शर्मा, हरीष पिंपळे, महापौर विजय अग्रवाल, शिक्षणविस्तार संचालक डॉ. मानकर, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, कुलसचिव डॉ. कडू यांच्यासह विद्यापीठाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ, विभागप्रमुख व इतर उपस्थित होते. सुरवातीला जयंतीनिमित्त पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.   

श्री. फुंडकर पुढे  म्हणाले, २००२ मध्ये हे बीटी तंत्रज्ञान मोन्सँटोने भारतात अाणले व कंपन्यांसोबत करार करून शेतकऱ्यांपर्यंत पोवले. देशात बीटी २ अाल्यानंतर किडीचा प्रादुर्भाव अधिक वाढत गेला. यावर्षी तर बोंड अळीचा उद्रेक झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. बोंड अळीबाबत २००६ तसेच २०१३ मध्ये अवगत करण्यात अाले होते. मात्र त्याकडे लक्ष दिले नाही. अाजवर ज्या कंपन्यांनी लुटले त्या कंपन्यांना अापण सोडणार नाही. मोन्सॅटो, महिकोवर कारवाईसाठी धडक पाऊल उचलली अाहेत.

राज्यात ८ डिसेंबरला या कंपन्यांचे सर्वात मोठे गोदाम सील केले, कारवाई करण्यास अापण कचरलो नाही. तसेच शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता अार्थिक मदत जाहीर केल्याचे श्री. फुंडकर यांनी नमूद केले. तत्पूर्वी विद्यापीठाने विकसित केलेल्या दोन मोबाईल ॲपचे लोकार्पण तसेच विविध विभागांच्या पुस्तिकांचे प्रकाशन या वेळी झाले.

कुलगुुरू डॉ. विलास भाले म्हणाले, विद्यापीठाकडे असलेल्या कृषी विद्यालयांकडे मोठ्या प्रमाणात जमिनी अाहेत. या जमिनींवर अागामी काळात बीजोत्पादन केले जाईल. शेतकऱ्यांना लागणारे दर्जेदार बियाणे तेथेच उपलब्ध करून देऊ.

माजी कुलगुरूंवर टीका

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांच्या कारभारावर ताशेरे अोढत कृषिमंत्री फुंडकर म्हणाले, त्यांच्या सहा वर्षांच्या कार्यकाळात विद्यापिठाचे मोठे नुकसान झाले. त्यांनी अनेक बोगस प्रस्ताव अापल्याकडे सादर केले. मात्र अापण ते नामंजूर केले. त्यांना पदावरून काढण्यासाठी अापण चारवेळा राज्यपालांची भेट घेतली. ते जाणार नाही असे सांगत होते. परंतु अाम्ही त्यांना येथून घालवलेच, असेही फुंडकर यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...