agriculture news in marathi, Ban from the Collector of Fodder outside the district | Agrowon

नगर जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस जिल्हाधिकाऱ्यांकडून बंदी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

नगर : जिल्ह्यात दुष्काळाचे सावट आहे. जिल्ह्यामध्ये शिल्लक असलेला चारा इतर जिल्ह्यांत जाऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा दंडाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक करण्यास बंदी घातली असून, आदेश जारी केले आहेत. या आदेशामुळे मात्र शेजारच्या मराठवाड्यातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मात्र मोठी अडचण होणार आहे.

नगर : जिल्ह्यात दुष्काळाचे सावट आहे. जिल्ह्यामध्ये शिल्लक असलेला चारा इतर जिल्ह्यांत जाऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा दंडाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक करण्यास बंदी घातली असून, आदेश जारी केले आहेत. या आदेशामुळे मात्र शेजारच्या मराठवाड्यातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मात्र मोठी अडचण होणार आहे.

नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. पाण्यासोबत चाऱ्याचाही प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. एप्रिल-मे च्या काळात गंभीर चारा टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. नगर जिल्ह्यामध्ये सप्टेंबर २०१८ अखेर पडलेला पाऊस सरासरीच्या तुलनेत कमी आहे. पुढील कालावधीत पावसाची शक्‍यता कमीच आहे. जिल्ह्यामध्ये पाणीटंचाई व जनावरांना चाराटंचाई निर्माण झालेली आहे. त्यामुळे चाऱ्याची पळवापळवी होऊन त्यातून मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे दोन महिन्यांच्या कालावधीकरिता (डिसेंबरअखेर) जिल्ह्याच्या बाहेर चाऱ्याची वाहतूक करता येणार नाही. तसा आदेश जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी काढला आहे.

नगर जिल्हा हा उसाचा जिल्हा म्हणून संबोधला जातो. आताही काही ठिकाणी बऱ्यापैकी ऊस आहे. दुष्काळी स्थितीत चाऱ्यासाठी उसाचा वापर केला जातो. आत्तापर्यंत चारा छावण्यांत उसाने जनावरे जगवण्याला आधार दिला आहे. यंदा मात्र शेजारच्या बीड, सोलापूर, औरंगाबाद भागात ऊस चाऱ्यासाठी नेला जातो. यंदा मात्र त्या भागात ऊस नाही आणि नगरमधून चारा नेण्यासाठी बंदी घातली असल्याने या जिल्ह्याची अडचण होऊन बसली आहे.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...
नगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक...
सोयाबीन दरात काही अंशी तेजीचा अंदाजनागपूर ः सोयाबीन दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना...
जळगावात चवळी, कारल्याचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
हळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...
सागरी तापमानाची जुनी माहिती मिळवणे...माहितीच्या नोंदीच्या अभावामुळे बहुतांश जागतिक...
मधमाश्यांचे सर्वेक्षण सातत्याने...गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक मधमाश्यांच्या...
बुलडाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडेबुलडाणा : उष्णतेच्या झळा सुरू होण्यापूर्वीच...
खानदेशात तूर खरेदी केंद्रे सुरू कराजळगाव : खानदेशात तुरीची मळणी पूर्ण होत आली आहे....
ऊस गाळपात नंदुरबार जिल्हा आघाडीवरजळगाव : खानदेशात ऊस गाळपात नंदुरबार जिल्ह्यातील...
नाचणी बीजोत्पादक शेतकऱ्यांना पन्हाळ्यात...कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात आत्माच्या...
गोदावरी दूध संघ शेतकऱ्यांसाठी ठरला ‘...नगर : ‘‘गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...
परभणी, हिंगोलीतील सिंचनासाठीच्या...परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २०१७-१८...
खरीप नुकसानीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्या...सोलापूर : गतवर्षीच्या २०१८ च्या खरीप हंगामात...