मागील दोन वर्षांपासून राज्यात कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळताना दिसत नाही.
ताज्या घडामोडी
नवी दिल्ली : राज्यातील विदर्भात कापसावर बोंडअळीने आक्रमण करून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले आहे. याला जबाबदार असणाऱ्या महिको आणि मोन्सॅन्टो या बियाण्यांच्या कंपन्यांवर कायमस्वरूपी बंदी आणावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी(ता.21) लोकसभेत नियम 377 नुसार केली. तसेच बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.

विदर्भ आणि मराठवाड्यात कपाशीवर बोंडअळीने आक्रमण करून हाहाकार माजवला आहे. हाताशी तोंडाशी आलेले कपाशीचे पीक बोंडअळीने हिसकावून घेतले आहे. या बोंडअळीमुळे विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे 15000 कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सुमारे 60 टक्के कपाशीचे पीक नष्ट झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची भीती आहे. या शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे आहे. काही कंपन्यांकडून आणि दलालाकडून बोगस बिटी बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले गेले आहे.
तरीही शासनाकडून काहीच कारवाई होताना दिसत नाही. या कंपन्यांच्या साखळी पद्धतीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. गतवर्षी नोटाबंदीमुळे येथील शेतकरी आधीच उद्ध्वस्त झालेला आहे. त्यातच फसवी कर्जमाफीमुळे त्यांची एक प्रकारे फसवणूक झालेली आहे, त्यातच बोंड अळीने येथील शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. त्यामुळे त्याला तातडीची मदत केंद्राने करावे जेणेकरून त्याला आधार मिळेल. या बोंड अळीच्या आक्रमणास महिको आणि मोन्सॅन्टो दोन कंपन्या जबाबदार आहेत. त्यांच्यावर केंद्राने कायमस्वरूपी बंदी आणावी अशी मागणीही या वेळी केली.
- 1 of 145
- ››