'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी घाला'

'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी घाला'
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी घाला'

पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने व्यापाऱ्यांनी सोयाबीनची आयात सुरू केली आहे. मात्र, आयात होणारे सोयाबीन हे जीएम असून, जीएम बियाण्यांना केंद्र शासनाने बंदी घातली असताना ही आयात सुरू आहे. यामुळे देशातील सोयाबीनचे दर ५० ते १०० रुपयांनी घसरले आहेत. दरातील घसरण रोखण्यासाठी तातडीने आयात बंदी करावी, अशी मागणी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी भारतीय खाद्य सुरक्षा मानक प्राधिकरणाच्या अध्यक्षा रिटा तेवलिया यांच्याकडे केली आहे.  याबाबत बोलताना पटेल म्हणाले, ‘‘सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सध्या ३ हजार ७०० ते ३ हजार ९०० रुपये असे   चांगले दर मिळत असताना, अनेक व्यापाऱ्यांनी परदेशातून सोयाबीन ३ हजार ५०० रुपयांनी आयात करण्यास सुरवात केली आहे. यामुळे देशांतर्गत बाजापेठेत सोयाबीनचे दर ५० ते १०० रुपयांनी कमी झाले आहेत. आयात होणारे सोयाबीन जीएम असून, जीएम वाण आयातीला केंद्र सरकारची बंदी आहे. यामुळे भारतीय खाद्य सुरक्षा मानक प्राधिकरणाने आयात होणाऱ्या सोयाबीनची तपासणी करावी व तातडीने आयात बंदी करावी, असे पत्र अध्यक्षा रिटा तेवलिया यांना दिले आहे.’’ याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय खाद्य सुरक्षा मानक प्राधिकरणाच्या अध्यक्षा रिटा तेवलिया यांना लक्ष घालण्याच्या सूचना केल्या. या वेळी श्रीमती तेवलिया यांनी याबाबत अधिक तीन संस्था काम करत असून, या विविध संस्थांच्या प्रमुखांशी बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन दिल्याचे पटेल यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com