agriculture news in Marathi, banana crop affected by cold in jalgaon district, Maharashtra | Agrowon

जळगाव जिल्ह्यात थंडीचा केळी पिकाला फटका
टीम अॅग्रोवन
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

मागील १८ ते २० दिवसांत लागवड केलेल्या केळीच्या कंदांच्या अंकुरणाची प्रक्रिया जवळपास थांबली आहे. लहान टिश्‍यू केळी रोपेही गार वातावरणाला बळी पडली आहेत. 
- मधुकर नामदेव सूर्यवंशी, केळी उत्पादक, कठोरा, ता. जळगाव

जळगाव ः मागील काही दिवसांपासून तापमानात घसरण होत असून, स्वच्छ सूर्यप्रकाशित वातावरणही नाही. यामुळे केळीची उगवण शक्ती, निसवणी, वाढ यावर प्रतिकूल परिणाम होत आहे. जिल्हाभरातील नव्या लागवडीच्या कांदेबागांमध्ये अधिकचा परिणाम दिसत आहे. याचवेळी टिश्‍यू रोपे आर्द्रतायुक्त वातावरण आणि थंडी यामुळे करपा रोगाला बळी पडले आहेत. रोपांची वाढ खुंटली आहे; तर मागील २० ते २२ दिवसांमध्ये लागवड केलेल्या केळीच्या कंदांचे अंकुरण हवे तसे होत नसल्याचे चित्र आहे.

 केळीला स्वच्छ सूर्यप्रकाशित व किमान १८ ते १९ पेक्षा अधिक तापमान हवे असते. जळगाव, नंदुरबार भागात मागील आठ ते १० दिवसांत किमान तापमान १६ अंश सेल्सिअसखाली आले आहे. त्यातच मध्येच ढगाळ वातावरण असते. या वातावरणातील बदलाचा परिणाम केळीला बाध्य करीत असल्याचे तज्ज्ञ व शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

कंद लागवड करून १८ ते २० दिवस झाले; पण ते अंकुरले नाहीत. त्यात रात्रीच्या वेळी पाण्याची पाळी देण्याचा खटाटोप शेतकरी करीत आहेत. खतेही टाकत आहेत; पण तरीही हवा तसा परिणाम कंदांबाबत दिसत नाही. यातच पाणी व गारवा यामुळे कंद कुजतील आणि नव्याने कंद लागवड करावी लागेल. अनेक ठिकाणी नांग्या भराव्या लागतील, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

शेतकरी खते, फवारण्यांनी त्रस्त
एकीकडे केळीला हवे तसे दर नाहीत. त्यातच आता करपा रोग फोफावू लागल्याने केळीला हवी ती अन्नद्रव्ये मिळून वाढ व्हावी, करपा रोखला जावा यासाठी शेतकरी फवारण्या घेत आहेत. शेतकरी विद्राव्य खतांचा वापर करीत आहेत. त्यात अधिकचा खर्च येत असून, उत्पादन खर्च वाढत आहे. 

रोपे, कंदांना फटका
रात्रीच्या गारव्याचा फटका कंद व दोन अडीच महिन्यांच्या टिश्‍यू केळी रोपांना अधिक बसत आहे. रोपे पिवळसर पडत आहेत. रावेर, यावल, जळगाव, चोपडा, भडगाव, जामनेर, असा सर्वत्र हा परिणाम दिसत आहे़, तर नंदुरबारात तळोदा, शहादा भागातही ही समस्या आहे. जळगाव जिल्ह्यात जवळपास ११ हजार हेक्‍टरवरील लहान केळीची टिश्‍यू रोपे व नऊ हजार हेक्‍टरवरील कंदांना या प्रतिकूल वातावरणाचा फटका बसल्याची माहिती आहे. नंदुरबार जिल्ह्यातही जवळपास अडीच हजार हेक्‍टरवरील केळीला प्रतिकूल वातावरणाची बाधा पोचली आहे.
 
निसवणीच्या बागांनाही फटका
सध्या रावेर, यावल, जळगाव, चोपडा आदी भागात काही केळी बागांमध्ये निसवणीची प्रक्रियाही सुरू आहे. पण घड पहिल्या पानातच अडकू लागले आहेत. तर फण्या, केळीच्या आकारावरही परिणाम दिसू लागला आहे. हव्या त्या लांबीचे घड नसल्याने सहा ते सातच फण्या ठेवण्याची वेळ काही शेतकऱ्यांवर आली आहे. अर्थातच यामुळे उत्पादनात १८ ते २१ टक्के घट शक्‍य आहे.

प्रतिक्रिया
थंडी वाढू लागल्याने कंद आणि केळी रोपांवर परिणाम दिसत आहे. पुढील काळात निसवणीच्या बागांमध्ये घडही अडकतील. शेंडे पिवळे पडतील. अशात पाण्याची पाळी रात्री देणे, बागांभोवती वारा अवरोधक तयार करणे व सायंकाळी बागेत शेकोट्या पेटविणे असे प्राथमिक उपाय करता येतील. 
- प्रा. नाझेमोद्दीन शेख, प्रमुख, केळी संशोधन केंद्र, जळगाव
 

इतर अॅग्रो विशेष
जगभरात अवशेषमुक्त मालालाच मागणीपुणे : निर्यातीत युरोपीय देशांप्रमाणे अन्य...
पूर्णधान्य आहाराचा आरोग्यासाठी होतो...आरोग्यासाठी साध्या धान्यांच्या तुलनेमध्ये...
सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी :...नवी दिल्ली  : २०१९ मध्ये सत्तेत आल्यास...
त्रिगुणी म्हशीची विजयी पताकाजगात सर्वप्रथम हॅंड गाईडेड क्लोनिंग म्हणजे हस्त...
जाणिवेचा लॉंग मार्चशेतकरी संपामुळे सरकारला कर्जमाफीची घोषणा...
विदर्भात विस्तारतो आहे पोल्ट्री व्यवसायकडक उन्हाळ्यामुळे पोल्ट्री व्यवसाय विदर्भामध्ये...
तुरळक पावसाचा अंदाज; तापमान वाढणारपुणे : राज्यात सोमवारी (ता. १९) मध्य महाराष्ट्र,...
कृषी योजनांचा निधी खर्च करण्यात अपयशपुणे : कृषी विभागाच्या विविध योजनांचा निधी...
शेतकरी आत्महत्यांचे सरकारला काहीच वाटत...राळेगणसिद्धी, जि. नगर : ‘‘लोकपाल आणि लोकायुक्त...
कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत व्याज माफ;...बारामती, पुणे ः "छत्रपती शिवाजी महाराज...
अवजारांची गुणवत्ता हाच बनलाय ब्रॅंडगिरणारे (जि. नाशिक) गावातील पिंकी सुधाकर पवार...
‘तेर` करतेय पर्यावरण, शिक्षण अन्‌ सौर...पुणे येथील ‘तेर पॉलिसी सेंटर` या स्वयंसेवी...
'कृषी उद्योग'मधील वादग्रस्त सूर्यगण...पुणे : महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळातील...
‘फॉस्फोनिक ॲसिड’च्या आढळाने ‘सॅंपल फेल’...पुणे : डाळिंब पिकात केवळ सातच लेबल क्लेम...
बोंड अळी, धान नुकसानग्रस्तांना मदतीसाठी...पुणे : बाेंड अळीच्या प्रादुर्भावाने नुकसान...
बेदाण्याचे यंदा तीस टक्केच उत्पादनसांगली : राज्यात दरवर्षी सुमारे २ लाख टन...
हमीभावाच्या मुद्द्यावरून गैरसमज पसरवले...नवी दिल्ली : उत्पादन खर्चावर ५० टक्के हमीभाव...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक...पुणे : राज्यावर अवकाळीचे ढग असल्याने पावसाचे सावट...
आसामी रेडकाचा ‘क्लोन’ यशस्वीहिस्सार, हरियाणा : येथील केंद्रीय म्हैस संशोधन...
राज्यात १५ लाख टन साखर उत्पादन वाढलेकोल्हापूर : राज्यात सुरू हंगामात यंदा अंदाजपेक्षा...