agriculture news in marathi, banana crop in crisis due to sun storke, nanded, maharashtra | Agrowon

नांदेड जिल्ह्यातील केळीबागा उन्हामुळे होरपळल्या
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 एप्रिल 2018
पाच एकरांवर केळी पिकाची लागवड केली होती; परंतु पाणी कमी पडू लागल्यामुळे दोन एकरांवरील 
बाग मोडून टाकली. उन्हामुळे झाडे होरपळत आहेत. 
- रमेश देशमुख, शेतकरी, पारडी, जि. नांदेड.
नांदेड ः केळी उत्पादक पट्टा म्हणून ओळख असलेल्या अर्धापूर (जि. नांदेड) तालुक्यासह जिल्ह्यातील अन्य भागांतील केळी पिकाच्या सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी होत चालली आहे. वाढत्या उन्हामुळे केळी बागा जागेवरच होरपळत आहेत. उभ्या बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. बागा नष्ट होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, अर्थकारण बिघडले आहे.
 
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुका केळी उत्पादक तालुका म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. मुदखेड, हदगाव या तालुक्यांत, तसेच नांदेड, भोकर तालुक्यातील काही गावांत केळी लागवड केली जाते.
 
जिल्ह्यात १० ते १२ हजार हेक्टरपर्यंत केळी पिकाची लागवड होते. यंदा इसापूर आणि सिद्धेश्वर हे धरण प्रकल्प भरतील, सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल, या अपेक्षने शेतकऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे केळी लागवड केली. परंतु जुलै - आॅगस्टमध्ये पावसाचा दीर्घ खंड पडला. विहिरी, बोअरचे पाणी सिंचनासाठी कमी पडू लागले. दोन्ही धरणे भरली नाहीत. कालव्याच्या आवर्तनाची शक्यता मावळली.
 
अनेक गावांतील शेतकऱ्यांनी आॅगस्ट- सप्टेंबरमध्येच केळी बागा मोडून टाकल्या, रब्बीतील पिके घेतली; परंतु त्या वेळी बऱ्यापैकी पाणी असल्यामुळे आजवर जोपासलेल्या बागांना आता पाणी कमी पडू लागले आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे झाडाची पाने करपून जात आहेत, तसेच वाऱ्यामुळे पाने फाटत आहेत. त्यात पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्यामुळे केळीचे फड होरपळून जात आहेत. यामुळे मोठे नुकसान झाल्याने केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
 

अर्धापूर तालुक्यातून पंजाब, हरियाना राज्यांत केळी पाठवली जातात. केळी काढणीच्या हंगामात काही हजार लोकांना रोजगार उपलब्ध होतो. दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. परंतु यंदा बागांचे नुकसान झाल्यामुळे उलाढाल कमी होणार आहे.

 
तुलनेने अधिक उत्पादन मिळत असल्यामुळे गेल्या काही वर्षांत या भागातील शेतकरी उतिसंवर्धित केळी रोपांची लागवड करत आहेत. त्यामुळे काही प्रमाणात पाण्याचा ताण, वारे यासाठी सहनशील, गोड चवीच्या अर्धापुरी वाणाचे क्षेत्र घटत आहे. कमी कालावधीत येणाऱ्या अन्य काही वाणांचे क्षेत्र वाढल्यामुळे केळीचे अर्धापुरी वाण नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

इतर ताज्या घडामोडी
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
कळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...
नाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...
कपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...
सांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...
नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...
नाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...
अकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...