agriculture news in marathi, banana crop faces variation in climate problem | Agrowon

बदलत्या वातावरणाचा केळीला फटका
टीम अॅग्रोवन
रविवार, 18 फेब्रुवारी 2018

जळगाव : हिवाळ्याच्या शेवटच्या कालावधीत विषम वातावरण तयार झाल्याने त्याचा फटका केळीसह हरभऱ्याला अधिक बसला आहे. जिल्ह्यात दोन ते महिने कालावधीच्या केळी बागांसह घाटे पक्व होत असलेल्या हरभऱ्यामध्ये अधिकचे नुकसान दिसून येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

जळगाव : हिवाळ्याच्या शेवटच्या कालावधीत विषम वातावरण तयार झाल्याने त्याचा फटका केळीसह हरभऱ्याला अधिक बसला आहे. जिल्ह्यात दोन ते महिने कालावधीच्या केळी बागांसह घाटे पक्व होत असलेल्या हरभऱ्यामध्ये अधिकचे नुकसान दिसून येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

जिल्ह्यात दोन दिवसांपासून निरभ्र वातावरण आहे. परंतु १ ते १३ फेब्रुवारीपर्यंत ढगाळ वातावरण होते. याचा अधिकचा परिणाम केळी पिकावर झाला. दोन महिने कालावधीच्या केळीची वाढ थांबली. निरभ्र वातावरण नसल्याने करपा रोगाला सक्रिय करणारी बुरशी सक्रिय झाली. झाडाची पाने पिवळी पडल्याने प्रकाश संश्‍लेषणाच्या प्रक्रियेत अडथळे आले. मुळांना अन्नद्रव्य घेण्यास समस्या निर्माण झाली. सहा महिने कालावधीच्या केळीत करपा रोगाचे प्रमाण प्रतिझाड सहा पाने तर दोन ते तीन महिने कालावधीच्या केळी बागेत प्रतिझाड चार पाने, असे करपाचे प्रमाण आहे. 

ज्या बागा निसवल्या त्यात हिरवी पाने लवकर पिवळी पडली व वाळली. मध्यरात्री थंडी व दिवसा उष्णता, आर्द्रता यामुळे घड पक्व होण्याचे प्रमाण कमी झाले. निसवणीनंतर केळीची कापणी व्हायला एक महिना कालावधी लागला. बुरशीनाशकांची फवारणी लहान बागांमध्ये घ्यावी लागली. त्यात उत्पादन खर्चही वाढला. सद्यःस्थिती वातावरण निवरले असले तरी केळीची वाढ समाधानकारक नाही. तसेच घडांचा दर्जाही हवा तसा नाही. आखूड केळीचे घड अधिक असून, अनेक ठिकाणी घडांचा आकारही लहान असल्याचे शेतकरी लालचंद पाटील (नशिराबाद, जि. जळगाव) म्हणाले. 

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...