हजारो केळी रोपांचे रानडुकरांकडून नुकसान

वन्यप्राण्यांकडून केळी पिकाचे नुकसान
वन्यप्राण्यांकडून केळी पिकाचे नुकसान

अकोला   ः सातपुड्यालगत असलेल्या अकोट तालुक्यातील अनेक गावांमध्ये वन्यप्राण्यांचा उच्छाद कायम अाहे. दोन दिवसांपूर्वी बोर्डी गावात केळी बागांचे नुकसान केल्याचा प्रकार उघडकीस अाला होता. त्यानंतर शनिवारीसुद्धा याच गावातील जगन्नाथ धर्मे यांच्या सहा एकर क्षेत्रातील केळी बागेतील हजारो रोपे रानडुकरांनी उखडून फेकली अाहेत. यामुळे त्यांचे लाखोंचे नुकसान झाले अाहे.

श्री. धर्मे यांनी पाणी उपलब्धता कमी असतानाही कोटेकोर नियोजन करीत बेलुरा शिवारात सहा एकरांत केळी रोपांची लागवड केली. पाण्याचे योग्य व्यवस्थापन करीत केळी रोपांची जोपासना सुरू असतानाच रानडुकरांनी शेतात उच्छाद घातला. प्रामुख्याने या सात एकर बागेतील अर्धेअधिक रोपे उखडून टाकली अाहेत. रोपाच्या मुळाशी असलेला कंद खाण्यासाठी रानडुकरे रोपे उखडून फेकत असल्याची बाब दिसून येत असल्याचे शेतकरी सांगत अाहेत.

दुष्काळी परिस्थिती असल्याने झालेले नुकसान सहन करण्याची शेतकऱ्यांची स्थिती नसून शासनाने मदत करावी, अशी मागणी श्री. धर्मे यांनी केली अाहे. वन्यजीव विभागाने तातडीने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी या भागातील शेतकरी सातत्याने करीत अाहेत. मात्र, अद्यापही याविभागाकडून कुठलीही कार्यवाही करण्यात अालेली नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com