agriculture news in marathi, Banana damage by the Randukars in Bordi Shivar | Agrowon

बोर्डी शिवारात रानडुकरांकडून केळीचे नुकसान
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

अकोला : वन्य प्राण्यांकडून शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकरी अार्थिक अडचणीत येत अाहेत. मागील दोन दिवसांत अकोट तालुक्यातील बोर्डी शिवारात रानडुकरांनी हैदोस घातला. त्यामुळे केळी बागायतदारांचे मोठे नुकसान झाले.

बोर्डी येथील श्रीराम भालतिलक, विशाल भालतिलक, उमेश भालतिलक, सागर भालतिलक या शेतकऱ्यांच्या शेतातील किमान २०० पेक्षा अधिक केळीच्या झाडांचे रानडुकरांनी नुकसान केले. याबाबत गुरुवारी (ता. ६) शेतकऱ्यांनी येथील वन्यजीव अधिकारी कार्यालयात निवेदन देऊन नुकसानभरपाईची मागणी केली.

अकोला : वन्य प्राण्यांकडून शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकरी अार्थिक अडचणीत येत अाहेत. मागील दोन दिवसांत अकोट तालुक्यातील बोर्डी शिवारात रानडुकरांनी हैदोस घातला. त्यामुळे केळी बागायतदारांचे मोठे नुकसान झाले.

बोर्डी येथील श्रीराम भालतिलक, विशाल भालतिलक, उमेश भालतिलक, सागर भालतिलक या शेतकऱ्यांच्या शेतातील किमान २०० पेक्षा अधिक केळीच्या झाडांचे रानडुकरांनी नुकसान केले. याबाबत गुरुवारी (ता. ६) शेतकऱ्यांनी येथील वन्यजीव अधिकारी कार्यालयात निवेदन देऊन नुकसानभरपाईची मागणी केली.

अकोट तालुक्यात अाधीच शेतकऱ्यांना पाणी समस्या भेडसावत आहे. त्यातही हिमतीने केळीच्या बागा उभ्या केल्या. झाडांवर केळीचे घड लगडले आहेत. काही दिवसांनी काढणी सुरू होईल. मात्र, रानडुकराच्या कळपाने बागेचे नुकसान केले. डुकरांनी केळीची लहान झाडे मुळासकट मोडली, तर मोठी झाडे पाडली. यावर अाता कुठलीही फळधारणा होणे शक्य नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

या भागात काही वर्षांपासून वन्यप्राण्यांचा त्रास वाढत अाहे. वन्यजीव विभागाने प्राण्यांचा बंदोबस्त करावा, यासाठी शेतकरी वेळोवेळी पाठपुरावा करतात. मात्र उपाययोजना होत नसल्याने वन्यप्राण्याचा त्रास वाढत असल्याचे विशाल भालतिक यांनी सांगितले. वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामा करावा आणि भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली.

इतर बातम्या
सरकारबी मदत करंना अन्‌ बॅंका कर्ज देईनातनांदेड ः गेल्या वर्षीबी अन्‌ औंदाबी पावसानं मारलं...
पाण्याअभावी संत्राबागा होताहेत सरपणपरभणी ः जिल्ह्यातील प्रमुख संत्रा उत्पादक गाव...
जळगावात दीड हजारांवर शेततळ्यांची कामे...जळगाव ः जिल्ह्यात "मागेल त्याला शेततळे''...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ साधणार...अमरावती ः दुष्काळ, पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर...
दोन्ही शिंदेंना आत्मविश्वास नडला सोलापूर : सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या...
नांदगाव तालुक्यात फळबागा वाचविण्यासाठी...नाशिक : नांदगाव तालुक्यातील फळबागा वाचविण्यासाठी...
सांगोला साखर कारखाना राज्य बँकेच्या...सोलापूर : सांगोला सहकारी साखर कारखाना राज्य...
‘कृष्णे’च्या पाणीपातळीत घटसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेला पाणीपुरवठा...
अरुणाग्रस्तांचा गाव न सोडण्याचा निर्धारसिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पात पाणीसाठा केला, तरी...
बुलडाण्यात मागणी आल्यास तत्काळ टँकर...बुलडाणा  : जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट भीषण...
नांदेड : साडेतेरा हजार हेक्टरवर उन्हाळी...नांदेड : जिल्ह्यात २०१९ च्या उन्हाळी हंगामात १३...
वऱ्हाडात विद्यमान खासदारांनाच पुन्हा...अकोला ः लोकसभा निवडणुकीच्या निकालात गुरुवारी (ता....
पुणे जिल्ह्यातील चौदा कारखान्यांकडे...पुणे   ः जिल्ह्यात गळीत हंगाम संपवून...
नाशिकला हेमंत गोडसे रिपीट, तर डॉ. भारती...नाशिक : नाशिक जिल्ह्यात नाशिक व दिंडोरी लोकसभा...
जळगावात कांदा विक्रीत शेतकऱ्यांची लूटजळगाव ः कांद्याचे दर दबावात असतानाच त्याची विपणन...
जळगावात किसान सन्मान निधीचे वितरण...जळगाव ः खानदेशात सुमारे सव्वादोन लाख शेतकऱ्यांना...
पुणे जिल्ह्यात फळबाग लागवडीसाठी एक...पुणे  ः यंदा खरीप हंगामात फळबाग लागवड करू...
निविष्ठांची तस्करी रोखण्यासाठी...यवतमाळ ः गेल्या वर्षीच्या अनुभवातून बोध घेत...
नगर, शिर्डीत ‘काँटे की टक्कर’ मतात...नगर ः भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या कामावर...
अकरापैकी सहा आमदारांचा लोकसभेत प्रवेशमुंबई ः सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात...