agriculture news in marathi, banana export status, akola, maharashtra | Agrowon

अकोटमधून इराणला ५० टन केळी निर्यात
टीम अॅग्रोवन
रविवार, 8 एप्रिल 2018

अकोला : जिल्ह्यातील केळी निर्यातीने वेग घेतला असून या हंगामात अकोटमधून आतापर्यंत ५० टन केळी इराणला निर्यात करण्यात आली आहेत.

मागील वर्षात जिल्हा प्रशासन, अपेडा, निर्यातदार आणि शेतकऱ्यांमध्ये केळीच्या करार शेतीला सुरवात झाली. एका कंपनीच्या पुढाकाराने १०० एकरांत निर्यातक्षम केळी पिकाची लागवड झाली होती. त्यातून उत्पादित झालेला माल आता निर्यात होऊ लागला आहे. या हंगामात आतापर्यंत ५० टन केळी इराणला निर्यात करण्यात आली. शुक्रवारी (ता. ६) केळी घेऊन निघालेल्या कंटेनरला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी हिरवा झेंडा दाखवला.

अकोला : जिल्ह्यातील केळी निर्यातीने वेग घेतला असून या हंगामात अकोटमधून आतापर्यंत ५० टन केळी इराणला निर्यात करण्यात आली आहेत.

मागील वर्षात जिल्हा प्रशासन, अपेडा, निर्यातदार आणि शेतकऱ्यांमध्ये केळीच्या करार शेतीला सुरवात झाली. एका कंपनीच्या पुढाकाराने १०० एकरांत निर्यातक्षम केळी पिकाची लागवड झाली होती. त्यातून उत्पादित झालेला माल आता निर्यात होऊ लागला आहे. या हंगामात आतापर्यंत ५० टन केळी इराणला निर्यात करण्यात आली. शुक्रवारी (ता. ६) केळी घेऊन निघालेल्या कंटेनरला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी हिरवा झेंडा दाखवला.

अकोट तालुक्‍यातील केळी मागील हंगामात इराकला पाठवण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाने निर्यातक्षम केळी उत्पादनाला पाठबळ देण्यासाठी अपेडाच्या पुढाकाराने निर्यातदार कंपन्या व शेतकऱ्यांमध्ये करार केला. त्यानंतर १०० एकरांत पहिल्या टप्प्यात लागवड झालेल्या क्षेत्रातून केळीची निर्यात केली जाऊ लागली.

या वेळी अकोट तालुक्‍यात झालेल्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय होते. पणन मंडळाचे सहायक महाव्यवस्थापक श्री. साबळे, अपेडाचे प्रशांत वाघमारे, उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर, उपविभागीय अधिकारी उदय राजपूत, तहसीलदार विश्‍वनाथ घुगे, नायब तहसीलदार राजेश गुरव, निर्यातदार मो. शकील मो. साजिद, श्रृती थेपाळे, नरनाळा फार्मर कंपनीचे पंजाबराव बोचे उपस्थित होते. मंडळ अधिकारी राजेश बोडखे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला केळी उत्पादक शेतकरी, महसूल विभागाचे अधिकारी व इतर उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...
आंब्यावरील मिजमाशी, शेंडा पोखरणाऱ्या...मिजमाशी प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर,...
फळपिके सल्लाकोणत्याही वनस्पतींच्या वाढीवर हवामानाचा कमी जास्त...
योग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...
धनगर समाजाचा उद्या औरंगाबादमध्ये धडक...औरंगाबाद : धनगर समाजाला एस.टी.(अनुसूचित जमाती)...
जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव...मनमाड, जि. नाशिक : जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक,...
केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री अनंत...बंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री व दक्षिण...
ऊस दरप्रश्नी सोलापुरात ‘स्वाभिमानी’...सोलापूर  ः गेल्या गळीत हंगामातील उसाची...
दिवाळी संपूनही शासकीय कापूस खरेदीला...अकोला : या हंगामात लागवड केलेल्या बागायती तसेच...
ऊस दरासाठी सातारा जिल्ह्यात रास्ता रोकोसातारा  ः जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने...
थकीत एफआरपीच्या मागणीसाठी शिरोळ येथे...कोल्हापूर  : साखर कारखान्यांनी गेल्या...
ऊस दरप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे त्रिधारा...परभणी : मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी यंदाचे ऊस...
सांगलीत एकरकमी ‘एफआरपी’कडेगाव, जि सांगली  ः कोल्हापूर जिल्ह्याने...