agriculture news in marathi, Banana Marchant wait for heavy rain | Agrowon

केळी उत्पादकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 ऑगस्ट 2018
रावेर, जि. जळगाव  : पावसाळ्याचे सव्वादोन महिने संपूनही सातपुड्याच्या पट्ट्यात सरासरीच्या ४० टक्केही पाऊस झालेला नाही. यामुळे चोपडा, रावेर व यावल पट्ट्यातील सुमारे दहा हजार विहिरी आणि कूपनलिकांची पाणीपातळी खालवली आहे. परिस्थिती कायम राहिली तर उन्हाळ्यात केळीच्या बागा वाचविणे कठीण होईल. केळी उत्पादक अडचणीत येण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
रावेर, जि. जळगाव  : पावसाळ्याचे सव्वादोन महिने संपूनही सातपुड्याच्या पट्ट्यात सरासरीच्या ४० टक्केही पाऊस झालेला नाही. यामुळे चोपडा, रावेर व यावल पट्ट्यातील सुमारे दहा हजार विहिरी आणि कूपनलिकांची पाणीपातळी खालवली आहे. परिस्थिती कायम राहिली तर उन्हाळ्यात केळीच्या बागा वाचविणे कठीण होईल. केळी उत्पादक अडचणीत येण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
सातपुड्याच्या पट्ट्यातील सुमारे दहा हजार विहिरी-कूपनलिकांची पाणीपातळी या काळात नदीनाल्यांना आलेल्या पुरामुळे वाढते असा अनुभव आहे. मात्र, या वर्षी पुरेसा पाऊसच झालेला नाही. येथील जमिनी ओलिताखाली असल्याने पावसाने ओढ देऊनही पीकस्थिती फारशी गंभीर नाही.
शेतकरी सिंचनाद्वारे पाणीपुरवठा करीत आहेत. मात्र, उन्हाळ्यात केळीला फटका बसण्याची भीती आहे. चोपडा, यावल भागातही स्थिती बिकट बनत आहे. अनेक धरणांतही २५ टक्के जलसाठा झालेला नाही. गूळ प्रकल्प कोरडा होत आहे.

प्रकल्पांचा साठा चिंताजनक ः
तालुक्‍यातील हतनूर (२१), गंगापुरी (३२), मंगरूळ (४४), अभोरा (४० ), सुकी (५५), यावल तालुक्‍यातील मोर (२४ टक्के) असा अत्यल्प पाणीसाठा आहे. तालुक्‍यातील १४ पैकी गुलाबवाडी, मोरव्हाल, कुसुंबा या पाझर तलावात १५ टक्के पाणीसाठा आहे.
तसेच सहस्रलिंग, जानोरी, विवरा, पिंपरी, अहिरवाडी, मोहगण आणि जिन्सी येथील पाझर तलावात पाण्याचा ठणठणाट आहे. तालुक्‍यातील ६ पैकी जिन्सीच्या एका कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात क्षमतेच्या सुमारे ४० टक्के पाणीसाठा आहे. मात्र, जिन्सीचे अन्य दोन, अभोरा, पाल आणि तामसवाडी येथील केटीवेअर कोरडे आहेत. चिनावल जवळच्या गौरखेडा परिसरात काही कूपनलिकांचे पाणी आटले आहे.

इतर ताज्या घडामोडी
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...