agriculture news in marathi, banana plantation area Increase in Nanded district | Agrowon

नांदेड जिल्ह्यात केळी लागवड क्षेत्रात वाढ
टीम अॅग्रोवन
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

नांदेड ः यंदा लवकरच विहिरी, बोअरची पाणीपातळी वाढली आहे. इसापूर धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ होत आहे. सिंचनासाठी पाणी मिळण्याची खात्री झाली आहे. सद्यःस्थितीत काही भागांत केळी लागवड सुरू आहे.

आॅक्टोबर महिन्यातील कांदेबाग लागवड आणि फेब्रुवारी महिन्यातील रामबाग केळी लागवडदेखील अपेक्षित आहे. त्यामुळे यंदा नांदेड जिल्ह्यातील केळी लागवड क्षेत्रात वाढ होणार आहे. नांदेड जिल्ह्यात केळीचे सरासरी क्षेत्र १० हजार हेक्टरपर्यंत असल्याचे मानले जाते.

नांदेड ः यंदा लवकरच विहिरी, बोअरची पाणीपातळी वाढली आहे. इसापूर धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ होत आहे. सिंचनासाठी पाणी मिळण्याची खात्री झाली आहे. सद्यःस्थितीत काही भागांत केळी लागवड सुरू आहे.

आॅक्टोबर महिन्यातील कांदेबाग लागवड आणि फेब्रुवारी महिन्यातील रामबाग केळी लागवडदेखील अपेक्षित आहे. त्यामुळे यंदा नांदेड जिल्ह्यातील केळी लागवड क्षेत्रात वाढ होणार आहे. नांदेड जिल्ह्यात केळीचे सरासरी क्षेत्र १० हजार हेक्टरपर्यंत असल्याचे मानले जाते.

अर्धापूर, नांदेड, मुदखेड, हदगाव, भोकर आदी तालुक्यांत केळीची लागवड केली जाते. केळी लागवडीचे जून-जुलै (मृगबाग), आॅक्टोबर (कांदेबाग), फेब्रुवारी (रामबाग) असे तीन लागवड हंगाम मानले जातात. यंदा मृगबाग केळीचे लागवड क्षेत्र जास्त आहे. यंदाच्या हंगामात आजवर ८ हजार हेक्टरवर केळी लागवड झाली असल्याचा अंदाज आहे.

अल्प पावसामुळे सिंचनासाठी पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षांत केळी लागवड क्षेत्रात घट झाली. तुलनेने कमी पाण्यावर किफायतशीर उत्पादन देणाऱ्या हळद या नगदी पिकांचा पर्याय शेतकऱ्यांनी स्वीकारला आहे. परंतु यंदा विहिरी, बोअरना मुबलक प्रमाणात पाणी आले आहे.

इसापूर येथील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या धरणातील पाणीसाठा ६५ टक्क्यांपर्यंत, तर सिद्धेश्वर धरणातील पाणीसाठा २५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. इसापूर धरणातून सिंचनासाठी पाणी आवर्तन मिळण्याची खात्री झाली आहे. त्यामुळे अर्धापूरसह अन्य तालुक्यांतील काही भागांत अजून केळी लागवड सुरू आहे.

मूग, सोयाबीनच्या काढणीनंतर आॅक्टोबर महिन्यात तसेच पाण्याच्या उपलब्धतेनुसार फेब्रुवारी महिन्यातदेखील लागवड होऊ शकते. त्यामुळे केळी लागवड क्षेत्रात आणखीन २ हजार हेक्टरची वाढ अपेक्षित आहे. पाण्याच्या उपलब्धतेमुळे जिल्ह्यातील केळी लागवड क्षेत्रात वाढ होणार आहे.

चांगले उत्पादन मिळते त्यामुळे मृगबाग केळीचे क्षेत्र अधिक आहे. इसापूर धरणातील पाण्याच्या उपलब्धतेमुळे लागवड क्षेत्र वाढणार आहे.
- प्रा. आर. व्ही. देशमुख,
प्रभारी अधिकारी, वनामकृवि केळी
संशोधन केंद्र, नांदेड.

इसापूर धरणातून पाणी मिळण्याची खात्री झाली आहे. मूग, सोयाबीन नंतर अनेक शेतकरी केळी लागवड करतील.
- ज्ञानेश्वर माटे,
शेतकरी, अर्धापूर, जि. नांदेड

गतवर्षी तीन एकरवर केळी लागवड केली होती. यंदा विहिरींना मुबलक पाणी आल्याने दीड एकरने क्षेत्र वाढवले आहे. अंतरात बदल करून बेड पद्धतीची लागवड केली.
- शिवाजी देशमुख,
शेतकरी, पार्डी, जि. नांदेड.

इतर बातम्या
सांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...
नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...
मुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...
नाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...
सातपुड्यातील लघू प्रकल्पांमध्ये अल्प...जळगाव : खानदेशात नंदुरबार, धुळे व जळगाव...
नाशिकला पहिल्यांदाच मशिनद्वारे...नाशिक : कांद्याची निर्यात करण्यासाठी कांदा...
तंत्रज्ञान शेतकरी स्नेही व्हायला हवे ः...औरंगाबाद : शेतीतील प्रश्न संपत नाहीत, कालपरत्वे...
प्रात्यक्षिकांनी सुधारित तंत्रज्ञानाचे...जालना : सुधारित तंत्रज्ञानाचा व नवीन वाणाच्या...
हिंगोली जिल्ह्यात एक लाख कुटुंबांना...हिंगोली ः केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी आयुष्मान...
परभणीत पीक कर्जवाटप प्रश्नी शेतकरी...परभणी ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जवाटप...
म्हैसाळ योजना सुरू करण्यासाठी हालचाली...सांगली ः जिल्ह्यातील ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन...
अकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...
गोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया   ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...
साताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा  : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...
नगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर  ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...
वाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम  ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...
खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा  : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...
ऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई :  राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...
महसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...
‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...