agriculture news in Marathi, banana producers neglected crop insurance in jalgaon district, Maharashtra | Agrowon

पीक विम्याकडे केळी उत्पादकांची पाठ
चंद्रकांत जाधव
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

विमा कालावधी संपला तरीही अजून भरपाई मिळालेली नाही. विमा कंपनी, शासकीय यंत्रणांबाबत वाईट अनुभव आल्याने नवीन योजनेत आम्ही सहभाग घ्यायचा की नाही याचा विचार करीत आहोत. 
- गोकूळ मोहन पाटील, केळी उत्पादक, कठोरा (जि. जळगाव)

जळगाव : मागील फळविमा कालावधीमधील नुकसानीसंबंधीचे पैसे शेतकऱ्यांना अजूनही न मिळाल्याने या वर्षाच्या फळपीक विमा योजनेकडे केळी उत्पादकांनी पाठ फिरविली आहे. आधी मागील नुकसान भरपाई अदा करा, मग यंदाच्या विमा योजनेत सहभाग घेण्याचा विचार करू, अशी भूमिका केळी उत्पादकांनी घेतली आहे. 

यंदा हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत सहभागाची मुदत ३१ ऑक्‍टोबरपर्यंत आहे. आता या योजनेत सहभागासाठी केवळ ११ दिवस राहिले आहेत. १५ हजार हेक्‍टरवरील केळीसंबंधीचा विमा काढला जाईल, ३० ते ३२ हजार केळी उत्पादक त्यात सहभाग घेतील, अशी अपेक्षा आहे. परंतु, अद्याप केवळ कर्जदार असलेले जवळपास सात हजार शेतकरीच या योजनेमध्ये सहभागी झाले आहेत. निम्मेपेक्षा अधिक शेतकरी सहभागी झालेले नाहीत. 

हेक्‍टरी सहा हजार रुपये विमा हप्ता केळी उत्पादकाला भरायचा आहे. तर गारपीट व वादळ यासंबंधीच्या जोखिमेसाठी वेगळे दोन हजार रुपये हेक्‍टरी भरायचे आहेत. कर्जदार केळी उत्पादकांचा विमा हप्ता केळी उत्पादकाच्या संमतीनुसार संबंधित बॅंक भरणार आहे. तर बिगर कर्जदार कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी), आपले सरकार केंद्र किंवा कुठल्याही राष्ट्रीयीकृत, सहकारी बॅंकेत विमा हप्ता भरू शकतो. त्यासाठी मात्र सातबारा उताऱ्यावर केळी पिकाची नोंद हवी तसेच बॅंक पासबूक, आधार कार्ड, पॅन कार्ड यांची गरज आहे. सातबाऱ्यावर केळीची नोंद असेल तरच केळीसाठी फळ पीकविमा योजनेतून विमा काढता येणार असल्याच्या निकषाबाबत काही केळी उत्पादकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

मागील वर्षाची भरपाई केव्हा?
मागील वर्षी जिल्ह्यातील १४ हजार हेक्‍टर केळीसंबंधीचा विमा ३० हजार शेतकऱ्यांनी काढला होता. यातील यावल, रावेर, चोपडा तालुक्‍यातील १८ हजार शेतकऱ्यांनाच या योजनेतून नुकसानीसंबंधीची रक्कम मिळालेली आहे. जळगाव, भडगाव, एरंडोल जामनेर आदी भागातील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात अद्याप रकमा आलेल्या नाहीत. तर वादळासंबंधीच्या नुकसानीसाठी फक्त जळगाव तालुक्‍यातील भोकर मंडळातील ८८ शेतकरी पात्र ठरले असून, एक हजार शेतकरी गारपिटीसंबंधीच्या नुकसानीसाठी पात्र आहेत. या शेतकऱ्यांनाही अजून नुकसानीसंबंधीची भरपाई मिळालेली नाही.

नियमानुसार विमा कालावधी संपल्यानंतर ४५ दिवसांमध्ये भरपाईच्या रकमा विमाधारकांच्या खात्यात वर्ग करणे बंधनकारक आहे. पण याबाबत चालढकल सुरू आहे. 

इतर ताज्या घडामोडी
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...