agriculture news in marathi, banana rate | Agrowon

नऊशे रुपयांवर केळीदर गेलेच नाही
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017

केळी उत्पादकांना प्रचलित दरांपेक्षा कमी दर देऊन जे व्यापारी फसवणूक करीत आहेत त्यांच्या तक्रारी बाजार समितीकडे कराव्यात. बाजार समिती केळी खरेदीसंबंधीच्या तपासणीसाठी गावोगावी मोहीमही सुरू करणार आहे.
- कैलास छगन चौधरी, प्रभारी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, जळगाव

जळगाव : जिल्ह्यात नवती व कांदेबाग केळीला मागील दोन महिन्यांत एक हजार रुपये प्रतिक्विंटलवर दर मिळालेच नाहीत. यातच मध्यंतरी दर 800 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले होते. याचा फटका केळी उत्पादकांना बसला असून, व्यापारी लॉबी जाहीर दरांपेक्षा आणखी कमी दरात खरेदी करून केळी उत्पादकांची लूट करीत आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक 22 हजार हेक्‍टर केळी लागवड रावेर येथे झाली आहे. यापाठोपाठ यावल, चोपडा, भडगाव, मुक्ताईनगर, जामनेर व जळगाव तालुक्‍यांत लागवड आहे. सध्या चोपडा, जळगाव व भडगाव परिसरात कांदेबाग कापणी सुरू आहे. तर यावल, रावेर, मुक्ताईनगर, जामनेर भागांत जुनारी केळी कापणी सुरू आहे.

तीन दर आणि फसवणूक
केळीचे तीन दर रोज जाहीर होतात. त्यात कांदेबाग, जुनारी व वापसी (दुय्यम दर्जा, आखूड) असे तीन प्रकार असून, कांदेबागाला मागील दोन महिन्यांत एक हजार रुपयांवर दर जाहीर झालेला नाही. रावेर (जि. जळगाव) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे दर जाहीर केले जातात. व्यापाऱ्यांनी या दरात केळी खरेदी करणे बंधनकारक आहे, परंतु हे बंधन न पाळता आखूड केळी, कमी दर्जा, अशी वेगवेगळी कारणे सांगून केळीची एक क्विंटलमागे जाहीर दरापेक्षा 150 ते 200 रुपये कमी देऊन सर्रास खरेदी सुरू आहे. अर्थातच कांदेबागाला 900 रुपये दर असला तर त्याची 700 ते 750 रुपयांत, जुनारीला 800 दर असेल तर त्याची 600 ते 650 रुपयांत खरेदी केली जात आहे.

बाजार समितीचे मौन
जळगाव, चोपडा बाजार समितीने मध्यंतरी केळीची जाहीर किंवा प्रचलित दरांपेक्षा कमी दरात खरेदी केली जाऊ नये, अशी सूचना दिली होती. तशी बैठकही मागील वर्षी दोन्ही बाजार समित्यांनी घेतली. तसेच शेतकऱ्यांना तक्रार करायचे आवाहन केले होते. पण कुण्या शेतकऱ्याने तक्रार केली नाही व बाजार समितीने कुठली कारवाईची मोहीम दोषी व्यापाऱ्यांविरुद्ध राबविली नाही. आता तर रावेर बाजार समिती दर जाहीर करते म्हणून त्यांनीच कारवाईचेही बघावे, शासनाशी पत्रव्यवहार करावा, अशी भूमिका जळगाव, चोपडा बाजार समितीने घेतली आहे.

इतर बातम्या
नाशिक जिल्ह्यात मेंढपाळांची चारा-...नाशिक : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत चारा-...
तिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव...तिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (...
पुणे झेडपी : भाकड कालावधीत...पुणे : जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जाती, जमातीच्या...
राज्याच्या माथ्यावरून दुष्काळाचा डाग...सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवरच...
नागपूर जिल्ह्यातील प्रकल्पांनी गाठला तळनागपूर  ः मॉन्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या...
चांदवड तालुका खरेदी-विक्री संघावर...नाशिक : चांदवड तालुका खरेदी- विक्री संघाने...
सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांना लागली...सांगली ः गेल्या तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यात...
वाघूरचे पाणी कापूस लागवडीसाठी देणार ः...जळगाव : वाघूर धरणातून धरण लाभक्षेत्रात शेतीसाठी...
जामनी शिवारात प्रतिबंधित बियाणे जप्तवर्धा ः कपाशीच्या प्रतिबंधित बियाण्यांची लागवड...
खरिपासाठी महाबीजच्या सोयाबीन बियाण्याला...अकोला ः या हंगामासाठी महाबीजचे सोयाबीन व इतर...
मराठवाड्यात शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची...औरंगाबाद : जूनच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी...
सोलापुरातील कांदा अनुदानाचा ३८७ कोटी...सोलापूर : कांद्याचे दर घसरल्याने गेल्या वर्षी...
पाण्याचे राजकारण नको : उदयनराजेसोलापूर  : ‘‘आपण पाण्यावरून कधीही राजकारण...
लोहा, कंधारमधील शेतकऱ्यांना दुष्काळी...माळकोळी, जि. नांदेड : लोहा आणि कंधार तालुक्यांत...
आषाढी वारीच्या पालखी मार्गावर टॅंकरने...सोलापूर : आषाढी वारी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकरी...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांना...औरंगाबाद : कृषी विभागातर्फे राबविल्या...
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
नांदेड विभागात ऊस क्षेत्रात ६० हजार...नांदेड : दुष्काळी स्थितीमुळे सिंचनासाठी पाणी...
केळी दरप्रश्‍नी रावेर येथे शेतकऱ्यांचा...जळगाव ः केळीची खानदेशात जाहीर दरांनुसारच खरेदी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...