agriculture news in marathi, Banana rate at constant level | Agrowon

जळगाव जिल्ह्यात केळीचे दर टिकून
टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

जळगाव : जिल्ह्यात केळीचे दर जवळपास महिनाभरापासून स्थिर आहेत. दर स्थिर असल्याने ज्यांची केळी उपलब्ध आहे, त्यांना त्याचा लाभ होत आहे. केळीचा बाजारातील पुरवठा कमी झाल्याने जम्मू काश्मीर, दिल्ली आदी भागातील निर्यात कमी झाली आहे. कांदेबागसह जुनारी केळीला सरासरी एक हजार रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक दर मिळाले आहेत. 

जळगाव : जिल्ह्यात केळीचे दर जवळपास महिनाभरापासून स्थिर आहेत. दर स्थिर असल्याने ज्यांची केळी उपलब्ध आहे, त्यांना त्याचा लाभ होत आहे. केळीचा बाजारातील पुरवठा कमी झाल्याने जम्मू काश्मीर, दिल्ली आदी भागातील निर्यात कमी झाली आहे. कांदेबागसह जुनारी केळीला सरासरी एक हजार रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक दर मिळाले आहेत. 

सध्या रावेरात फारशी केळी कापणीवर नाही. मार्च महिन्यात आगाप लागवडीच्या बागांमध्ये कापणी काही प्रमाणात सुरवात झाली आहे. तर पिलबागांमधून अधिकची केळी निघत आहे. यावल, चोपडा, भडगाव भागात पिलबाग केळी कापणीवर अधिक आहे. अर्थातच केळीची आवक कमी असल्यानेच दर स्थिर असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सावदा (ता.रावेर) येथून जम्मू, पंजाब, उत्तर प्रदेशातील केळी निर्यात कमी झाली आहे. ऑक्‍टोबरमध्ये रोज सुमारे साडेचार ते पाच हजार क्विंटल केळीची निर्यात जम्मू व पंजाब, दिल्ली आदी भागात केली जात होती. परंतु सध्या निर्यात कमी झाली आहे. कांदेबाग केळीची कापणी पूर्ण झाली आहे. जुनारी केळी स्थानिक बाजारासह मुंबई येथे पाठविली जात आहे. तिलाही एक हजार रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक दर आहे. 

कांदेबाग केळीला जानेवारी महिन्यात सरासरी एक हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे. तर जुनारीसह पिलबाग केळीला सरासरी १०५० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे.  सावदा येथील केळी निर्यातदार किंवा व्यापाऱ्यांना चोपडा, जामनेर भागातून केळी मागवावी लागत आहे. बॉक्‍समध्ये पॅकिंगसाठी दर्जेदार केळीची गरज असते. त्यामुळे टिश्‍यू रोपांच्या केळीला मागणी अधिक दिसून येत आहे. 

केळीचा पुरवठा कमी असल्याने निर्यातीवर परिणाम झाला आहे. परंतु जुनारी व वापसी प्रकारची केळी मिळत असून, तिची मुंबईच्या बाजारात पाठवणूक सुरू आहे. 
- सुधाकर चव्हाण, 
केळी बाजार अभ्यासक

सध्या फक्त आगाप लागवडीच्या केळी बागा कापणीवर आहेत. रावेरात पिलबागच उपलब्ध आहेत. त्यामुळे दर्जेदार केळीचा पुरवठा कमी आहे. 
- विकास महाजन, शेतकरी, ऐनपूर (ता. रावेर, जि. जळगाव)

इतर अॅग्रो विशेष
जपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...
कुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...
नाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...
सांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...
अॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे  : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...
अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे  ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...
दुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई   ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...
गोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...
पिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...
कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
आयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
ऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...