agriculture news in marathi, Banana rate improved by 60 rupees in Khandesh | Agrowon

खानदेशात केळीच्या दरात ६० रुपयांनी सुधारणा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 मे 2019

जळगाव  ः खानदेशात केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या रावेर, यावल, मुक्ताईनगर, शहादा, तळोदा (जि. नंदुरबार) भागात केळीचा पुरवठा कमी होत आहे. दर्जेदार केळीच्या दरात क्विंटलमागे मागील तीन दिवसांत ७० रुपयांनी सुधारणा होऊन दर १२१० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. खानदेशलगतच्या मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुरातील बाजारात केळीला रविवारी (ता. ५) मागील दोन महिन्यांमधील उच्चांकी १६६१ रुपये प्रतिक्विंटलचे दर जाहीर लिलावात मिळाले. 

जळगाव  ः खानदेशात केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या रावेर, यावल, मुक्ताईनगर, शहादा, तळोदा (जि. नंदुरबार) भागात केळीचा पुरवठा कमी होत आहे. दर्जेदार केळीच्या दरात क्विंटलमागे मागील तीन दिवसांत ७० रुपयांनी सुधारणा होऊन दर १२१० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. खानदेशलगतच्या मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुरातील बाजारात केळीला रविवारी (ता. ५) मागील दोन महिन्यांमधील उच्चांकी १६६१ रुपये प्रतिक्विंटलचे दर जाहीर लिलावात मिळाले. 

बऱ्हाणपूर येथे केळीच्या दरात महिनाभरापासून सुधारणा होत आहे. बऱ्हाणपूर जिल्ह्यातील तापीकाठानजीकच्या नाचणखेडा, बहादरपूर व इतर १० - १२ गावांमध्ये केळीची निर्यात वाढली आहे. पुरवठा कमी आहे. मागणी बऱ्यापैकी आहे. यातच या आठवड्यात मुस्‍लिम बांधवांच्या रमजान महिन्यास प्रारंभ झाल्याने केळीची मागणीही वाढली आहे. बऱ्हाणपूर येथे मागील आठवड्यात प्रतिदिन २१० ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) केळीची आवक झाली. यावल, रावेर, मुक्ताईनगरात मिळून १८० ट्रक केळीचा पुरवठा झाला. शहादा व तळोदा भागांतील केळीची आखातात निर्यात होत असून, तेथे सहा कंपन्यांनी केळी निर्यातीसाठी काम सुरू केले आहे. त्या भागात दर्जेदार केळी काढणीसाठी उपलब्ध होत आहे. 

फैजपूर (ता. यावल), सावदा (ता. रावेर) भागातून केळीची उत्तरेकडे पाठवणूक जोमात सुरू आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा व काश्‍मिरातून केळीची मागणी वाढली आहे. परिणामी, रावेर भागात नवती केळीचे दर मागील तीन-चार दिवसांत ११४० रुपये प्रतिक्विंटलवरून १२१० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. रावेरात पिलबाग केळीला प्रतिक्विंटल ११३० रुपये दर मिळत आहे. जळगाव भागात नवती केळीला ११७० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळत आहेत. 

जळगाव, पाचोरा, जामनेर, भडगाव भागात नवती केळी काढणीसाठी कमी उपलब्ध असून, ती ठाणे, कल्याण, पुणे, छत्तीसगड, नागपूर, राजस्थानात पाठविली जात आहे. नागपूर, छत्तीसगडमधील केळी पिकवणी केंद्रचालक जळगाव व चोपडामधील एजंटच्या माध्यमातून दुय्यम दर्जाची केळी ८०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक दराने खरेदी करीत आहेत. चोपडा व जळगाव बाजारात कांदेबाग केळीचे स्वतंत्र दर जाहीर होत असून, कांदेबाग केळी मात्र काढणीसाठी उपलब्ध नसल्याची माहिती मिळाली. 

निर्यातीची गती कायम
केळीची आखातातील निर्यात रावेर, शहादा भागातून सुरू आहे. शहादा येथून प्रतिदिन किमान १०० मेट्रिक टन, तर रावेर, मुक्ताईनगर भागातून प्रतिदिन १२० ते १४० मेट्रिक टन केळीची निर्यात होत आहे. या केळीला रावेर बाजार समितीने नवती केळीसाठी जाहीर केलेल्या दरांच्या तुलनेत १५० रुपये क्विंटलमागे अधिक मिळत आहेत. सध्या निर्यातीच्या केळीला १३५० रुपये प्रतिक्विंटलचा दर शेतकऱ्यांना जागेवरच मिळत असल्याची माहिती मिळाली.

इतर बाजारभाव बातम्या
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये टरबूज प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिकमध्ये टरबुजाची आवक ९६० क्विंटल झाली...
पुण्यात कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरचीचे दर...पुणे  : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत कोबीला प्रतिक्विंटल १२०० ते २०००...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात वांगी प्रतिक्विंटल ५०० ते ३०००...साताऱ्यात १५०० ते २००० रुपये सातारा येथील...
जळगावात आले प्रतिक्विंटल ३००० ते ७०००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक : नाशिकमध्ये ढोबळी मिरचीची आवक १६३...
सोलापुरात कांदा दरात किंचित सुधारणासोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे बाजार समितीत श्रावण घेवडा,...पुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
राजस्थान, मध्य प्रदेशातून गव्हाच्या...जळगाव : बाजार समितीमधील किरकोळ व घाऊक विक्रेते,...
परभणीत काकडीला प्रतिक्विंटल ७०० ते १५००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात लिंबू प्रतिक्विंटल ८०० ते ६०००...जळगावात २४०० ते ४००० रुपये  जळगाव : कृषी...
कोल्हापुरात टोमॅटोला प्रति दहा किलोस ५०...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
सोलापुरात मेथी, शेपूला उठाव, दरात...सोलापूर  : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात केळीच्या दरात ६० रुपयांनी...जळगाव  ः खानदेशात केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मानवत बाजार समितीत उद्यापासून हळद खरेदीमानवत, जि. परभणी ः मानवत येथील कृषी उत्पन्न बाजार...
अक्षय तृतीयेनिमित्त आंब्याला मागणीपुणे ः मंगळवारी (ता. ७) साजऱ्या होणाऱ्या अक्षय...
औरंगाबादेत आंबा ४ हजार ते १० हजार रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत शेवग्याला प्रतिक्विंटल १५०० ते...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...