agriculture news in marathi, banana rate increased, Maharashtra | Agrowon

केळी बाजार सावरला
चंद्रकांत जाधव
बुधवार, 12 सप्टेंबर 2018
  • ‘ॲग्रोवन’ने प्रसिद्ध केलेल्या केळी दरांबाबतच्या वृत्तमालिकेमुळे व्यापाऱ्यांनी ऑनचे दर अर्ली कांदेबाग केळीसंबंधी दिले. आमच्या २२ किलो रासच्या दर्जेदार कांदेबाग केळीला ११०० रुपयांपर्यंतचे दर सहज मिळत आहेत. 

- श्रीकांत पाटील, केळी उत्पादक, कठोरा, जि. जळगाव

जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार किंवा निर्यातक्षम केळीला १३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे दर मिळाले आहेत. निर्यातक्षम केळीला २५० रुपये प्रतिक्विंटल, असे ऑनचे (जादा) दर मिळत आहे. पिलबाग केळीमधील कापणी जवळपास आटोपली आहे. यावल, मुक्ताईनगर, रावेरातून केळीचा पुरवठा कमी झाला आहे. केळीची जाहीर दरांपेक्षा कमी दरात खरेदी व व्यापाऱ्यांकडून पिळवणूक यासंबंधी ‘ॲग्रोवन’ने मागील महिन्यात प्रसिद्ध केलेल्या वृत्तमालिकेची दखल घेत दरांची काटेकोर अंमलबजावणीसंबंधी खरेदीदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे अर्ली कांदेबाग केळीला भावफरकही दिला जात आहे.

२५ किलो रासच्या केळीला प्रतिक्विंटल ११५० रुपयांपर्यंतचे दर मिळाले. मागील जून व जुलै महिन्याच्या तुलनेत केळीला अधिकचे दर मिळत आहेत. तर मागील वर्षाच्या तुलनेत यंदा स्थिती बरी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्हा प्रशासनाने बाजार समित्यांना दरांच्या काटेकोर अंमलबजावणीच्या सूचना दिल्या असून, संबंधित बाजार समित्यांच्या क्षेत्रात कमी दरात खरेदी झाल्याची तक्रार सिद्ध झाली तर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे व्यापारी मंडळीने सावध भूमिका घेत जे दर जाहीर होत आहेत, ते भावफरकासह देण्यास सुरवात केली आहे.

कांदेबाग केळीला क्विंटलमागे १८ रुपये फरक मिळाला. ज्या शेतकऱ्यांच्या केळीची रास २५ पेक्षा अधिक मिळाली, त्यांना हे भावफरक अधिकचे मिळाले. काही व्यापाऱ्यांनी दर्जेदार केळीला भावफरकऐवजी २०० ते २५० रुपये जादा दर क्विंटलमागे दिले आहेत. 

मुक्ताईनगर (जि. जळगाव) तालुक्‍यातील अंतुर्ली भागातील केळी उत्पादकांना निर्यातक्षम केळीसंबंधी जादा दर मिळाले. तर जळगाव तालुक्‍यातील किनोद, कठोरा, भोकर भागातील २० ते २२ च्या रासच्या दर्जेदार केळीला भावफरक मिळाले. जादा दरांसह १३०० रुपये प्रतिक्विंटल या दरात केळीची विक्री झाली. पंजाब, दिल्ली व काश्‍मिर येथे या भागातून केळीची पाठवणूक झाली. क्रेटमध्ये केळी भरून वातानुकूलित यंत्रणा असलेल्या १५ टन क्षमतेच्या वाहनातून केळीची वाहतूक झाली.

पाचोरा, जळगाव भागातून ठाणे, कल्याण व पुणे भागात केळीची पाठवणूक झाली. यावल व मुक्‍ताईनगर तालुक्‍यांच्या तुलनेत सध्या चोपडा, जळगाव भागातून अर्ली कांदेबाग केळीची कापणी अधिक सुरू आहे. चोपडा, जळगाव व पाचोरा भागात मिळून प्रतिदिन १७० ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीचा पुरवठा झाला. तर रावेर, यावल व मुक्ताईनगर मिळून प्रतिदिन २०० ट्रक केळीचा पुरवठा झाला. 

छत्तीसगड, नागपूर, ठाणे, कल्याण, पुणे येथे पाठवणुकीच्या केळीला (लोकल) ८०० रुपयांपर्यंतचे दर मिळाले. जुनारी बागांमधून ही केळी उपलब्ध होत असून, तीदेखील पुढे कमी होईल. 

पिलबाग केळीला प्रतिक्विंटल ८४० रुपये दर मिळाले. पिलबाग केळीचे दर स्थिर होते. तर कमी दर्जाच्या किंवा जुनारी बागांमधील केळीला ५०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. गणेशोत्सव, लागलीच नवरात्रोत्सव आहे. रावेर, यावलमधून केळीचा पुरवठा कमी होत आहे. पुढे दर्जेदार केळीचा तुटवडा काही दिवस राहू शकतो. त्यामुळे पाचोरा, भडगाव, जळगाव, चोपडा भागातील कांदेबाग केळीला चांगला उठाव राहील. दरवाढ होण्याची शक्‍यता आहे, असे बाजारपेठेतील जाणकारांचे म्हणणे आहे. 

दरात सुधारणा

  • लोकलच्या केळीला ८५० पासून दर
  • उत्तर भारतातून चांगली मागणी
  • निपाह विषाणूच्या अफवा दूर होऊन दरात सुधारणा
  • गतवर्षीच्या तुलनेत ऑनचे दर १०० रुपयांनी अधिक
  • एकाच क्षेत्रात १५ टन दर्जेदार केळी असल्यास ऑनचे दर २५० रुपयांपर्यंत
  • तांदलवाडी भागातील केळीची यंदा प्रथमच आखातात निर्यात
  • मध्य प्रदेशातील शहापूर, बऱ्हाणपूर, दापोरा, खोपनार, पातोंडी भागात निर्यातक्षम केळीला १४०० रुपये दर

प्रतिक्रिया
दर्जेदार केळीला यंदा ऑनचे दर अधिक आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत स्थिती बरी आहे. रावेर, मुक्ताईनगरमधून केळीचा पुरवठा कमी झाला आहे. एकाच ठिकाणी १५ ते १६ टन निर्यातक्षम केळी उपलब्ध असली तर व्यापारी २५० रुपये क्विंटलमागे अधिक देत आहेत. १३०० रुपयांपर्यंतचे दर निर्यातक्षम केळीला आहेत. पुढे आणखी दरवाढ होईल, असे वाटते. 
- विकास महाजन, केळी उत्पादक, ऐनपूर, ता. रावेर, जि. जळगाव

 

 

इतर बातम्या
एकनाथ डवलेंकडे कृषी सचिवपदाचा पूर्णवेळ...मुंबई : मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले...
परभणी : दुष्काळाच्या फेऱ्यात फळबागा...परभणी ः जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढल्यामुळे...
विरोधी पक्षनेता आज ठरणार; पृथ्वीराज...नागपूर ः राधाकृष्ण विखे पाटील यांच्या...
सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांत टाकली...नागपूर ः दुष्काळी मदत नाही, कर्जमाफीच्या...
वडगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोर...वडगाव निंबाळकर, जि. पुणे  ः नीरा डावा...
पुणे बाजार समितीवर पुन्हा प्रशासकीय...पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे बाजार...
कृषी निविष्ठांमध्ये हवी मधमाशीपुणे : पीक उत्पादनात अत्यंत मोठा हातभार असलेल्या...
पाण्याअभावी होरपळली तुती; रेशीम उत्पादक...नांदेड : दुष्काळी स्थितीमुळे सिंचनासाठी...
हुमणी नियंत्रणासाठी सातारा कृषी...सातारा  : हुमणी नियंत्रणासाठी कृषी विभागाने...
अमरावती जिल्ह्यातील नदीनाल्यांमध्ये...अमरावती : पावसाचे पाणी जमिनीत मुरून...
राणी सावरगाव येथील चारा छावणीत चौदाशेवर...परभणी  ः दुष्काळी स्थितीमुळे जिल्ह्यात...
येवल्यातील ८० हजारांवर विहिरी कोरड्याठाकयेवला, जि. नाशिक : ब्रिटिशकालीन अवर्षणप्रवण अन्...
धनोली धरणाचे गेट तोडल्याने पाण्याचा...नाशिक   : कळवण तालुक्यातील धनोली येथील...
विषबाधा नियंत्रणाची जबाबदारी आता...यवतमाळ : जिल्ह्यात फवारणीदरम्यान झालेल्या विषबाधा...
उन्हाचा चटका अन् उकाड्यातही वाढपुणे : विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरीसह मध्य...
सेंद्रिय, विषमुक्त शेतीचा बांधापर्यंत...पुणे: सेंद्रिय व विषमुक्त शेती तंत्रज्ञानाचा...
SakalSaamExitPolls : कोकणात युतीचीच लाट...यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोकणचा बालेकिल्ला...
SakalSaamExitPolls : मुंबईत भाजप,...सकाळ आणि सामच्या सर्वेक्षणानुसार, - मुबईत युतीला...
SakalSaamExitPolls : मराठवाड्यात युतीला...मराठवाड्यात भाजपला ०३, शिवसेनेला ०२, काँग्रेसला...
SakalSaamExitPolls : उत्तर महाराष्ट्रात...महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रात भाजपचे 'कमळ' ५...