agriculture news in marathi, Banana rate stable; Early Kandebag grew inward | Agrowon

केळी दर स्थिर; अर्ली कांदेबाग आवक वाढली
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

जळगाव ः जिल्ह्यात रावेर व मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर भागात केळीचे दर स्थिर आहेत. उत्तरेकडे श्रावण मासानिमित्त केळीची मागणी चांगली आहे. पिलबागांची कापणी अंतिम टप्प्यात आहे. रावेर व यावलमध्ये अधिक आवक असून, प्रतिदिन २०० ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीची आवक झाली. नवती केळीला ९६५ रुपये तर पिलबाग केळीला ८१५ रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले.

जळगाव ः जिल्ह्यात रावेर व मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर भागात केळीचे दर स्थिर आहेत. उत्तरेकडे श्रावण मासानिमित्त केळीची मागणी चांगली आहे. पिलबागांची कापणी अंतिम टप्प्यात आहे. रावेर व यावलमध्ये अधिक आवक असून, प्रतिदिन २०० ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीची आवक झाली. नवती केळीला ९६५ रुपये तर पिलबाग केळीला ८१५ रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले.

पिलबाग केळीच्या दरात मागील चार दिवसांत जवळपास ७५ रुपये क्विंटलमागे वाढ झाली. तर नवती केळीचे दरही टिकून राहिले आहेत. बऱ्हाणपूर येथील बाजारात कमी दर्जाच्या केळीची आवक अधिक झाली. तेथे प्रतिदिन ३०० ट्रक केळीची आवक झाली. यातील कमाल केळीची पाठवणूक नागपूर, छत्तीसगड व राजस्थानात येथे झाली.
तर रावेर व यावल येथून बॉक्‍समध्ये पॅकिंग केलेल्या केळीची पाठवणूक काश्‍मीर, पंजाब व दिल्ली येथे झाली. तसेच ठाणे, कल्याण येथील मागणीही कायम राहीली.

पिलबाग केळी कमी उपलब्ध झाली. रावेर भागात पिलबाग केळी अधिक दर्जेदार राहीली. तिची थेट वातानुकूलित यंत्रणा असलेल्या मालवाहू वाहनातून क्रेटमध्ये भरून पंजाबला पाठवणूक झाली. मुक्ताईनगर, रावेर तालुक्‍यांतील तापीकाठावरील भागातील पिलबाग केळी जवळपास संपली आहे. रावेरच मध्य भागात पिलबाग केळीची कमी अधिक स्वरूपात कापणी झाली. सध्याचे कोरडे व आर्द्रतायुक्त वातावरण केळी पक्व हेण्यास पोषक असल्याने घड लवकर कापणीवर आले.

चोपडा, जळगाव व जामनेर भागात अर्ली कांदेबागांची कापणीही अधिक प्रमाणात सुरू झाली. या भागातून पंजाब व ठाणे येथे क्रेटने केळी पाठविण्यात आली. अर्ली कांदेबागासंबंधी काही शेतकऱ्यांना क्विंटलमागे १५० रुपये ऑनचे दर मिळाले. केळीची आवक मागील महिन्याच्या तुलनेत पुढे कमी राहील, असे मात्र जाणकारांनी सांगितले आहे. कारण रावेर व यावलमध्ये कापणीवरील केळी बागा संपत आल्या आहेत. तर चोपडा, जळगाव व जामनेरात कांदेबाग केळीची कापणी जोमात व्हायला काही दिवस वेळ आहे, असे सांगण्यात आले.

धान्य आवक ठप्प
सध्या व्यापारी ते व्यापारी, असे व्यवहार बाजार समितीमध्ये धान्यासंबंधी होत आहे. मध्य प्रदेशातील बुंदेलखंड, हरदा भागातून गव्हाची जवळपास ५०० क्विंटल आवक मागील आठवड्यात जळगाव बाजार समितीत झाली. मका, दादरची आवक मात्र जवळपास शून्यावर आली आहे. तर सोयाबीन व डाळींचे व्यापारी ते व्यापारी, असे व्यवहार झाले.

भरताच्या अर्ली लागवडीतून आवक
भरताच्या वांग्यांची अर्ली लागवड केलेल्या भुसावळ, जामनेरातील भागातून आवक सुरू झाली. त्यांना प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाला. तर काटेरी, काळ्या वांग्यांनाही १६०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाल्याची माहिती मिळाली.

इतर ताज्या घडामोडी
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...
नाशिकमध्ये युतीचे उमेदवार ठरेनानाशिक: लोकसभेच्या निवडणुकीसाठी नाशिक व दिंडोरी...
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...