agriculture news in Marathi, Banana rates stable due to less demand, Maharashtra | Agrowon

कमी मागणी झाल्यानंतर केळी दरात स्थिरता
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

सध्या उतिसंवर्धित रोपांच्या केळीला अधिक मागणी आहे; परंतु जम्मू, दिल्लीमधील ओखी चक्रीवादळ, धुक्‍याच्या वातावरणामुळे कापणी कमी झाली आहे. 
- चंद्रकांत पाटील, केळी उत्पादक, खरद, जि. जळगाव

जळगाव ः दिल्लीमधील धुक्‍याचे वातावरण आणि जम्मूमधील ओखी चक्रीवादळाचा परिणाम जिल्ह्यातील केळी निर्यातीवर झाला आहे. यातच मागील दोन महिन्यांपासून दर ९५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत स्थिर आहेत. 

जिल्ह्यातील चोपडा व जळगाव, जामनेर तालुक्‍यातच सध्या अधिकची केळी कापणीवर आहे. रावेर, यावल, मुक्ताईनगर, भडगाव भागात कांदेबाग कमी असल्याने निर्यातीवर परिणाम झाला असला तरी दर स्थिर असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली आहे. जिल्ह्यात कांदेबाग केळी सध्या कापणीवर आहे.

मागील पंधरवड्यापासून जम्मू-काश्‍मिरात ओखी चक्रीवादळामुळे निर्यातीवर परिणाम झाला आहे. जम्मूमधील व्यापाऱ्यांनी मागविलेली केळी आठ ते १० दिवस ट्रकमध्ये अडकून पडत आहे. तसेच दिल्लीतील धुक्‍यामुळे केळी निर्यातीवर परिणाम झाला.

सावदा, रावेरातील मोठ्या केळी निर्यातदारांकडून दिल्ली, जम्मू, पंजाब व हरियाना येथे रोज सात ते आठ हजार क्विंटल केळी पाठविली जात होती; पण सध्या ही निर्यात प्रतिदिन दोन ते अडीच हजार क्विंटलवर आल्याची माहिती मिळाली. अशात काही व्यापाऱ्यांनी मुंबईकडील केळीपुरवठा वाढविला आहे. बिगर उतिसंवर्धित रोपांपासून तयार झालेल्या केळीचा मुंबईत अधिकचा पुरवठा होत आहे. उतिसंवर्धित रोपांच्या केळीला २५० रुपये अधिक दर मिळत आहे. 

त्यामुळे सध्या उत्तरेकडील राज्यांमध्ये जिल्ह्यातून होणारा केळीचा पुरवठा कमी झाला आहे. तेथील व्यापाऱ्यांनी आयात कमी केली आहे. कांदेबाग केळीला ९५० रुपये दर दोन महिन्यांपासून मिळत आहे, तर जुनारीचे दरही ८०० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहेत. थंड वातावरणामुळे केळी पक्व होण्याची किंवा तयार होण्याची प्रक्रियाही काहीशी मंदावली आहे. जानेवारीपर्यंत दर स्थिर राहू शकतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. 

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...