दक्षिण गुजरातमध्ये शेतकऱ्यांचा केळी पिकाकडे ओढा

गुजरातमध्ये केळी लागवड वाढत आहे. (संग्रहीत छायाचित्र)
गुजरातमध्ये केळी लागवड वाढत आहे. (संग्रहीत छायाचित्र)

दक्षिण गुजरातमध्ये बागायतदार शेतकऱ्यांसाठी अन्य पिकांच्या तुलनेमध्ये केळी हे पीक अधिक फायदा देणारे ठरत आहे. सध्या गुजरात राज्यामध्ये केळी लागवडीखाली असलेले क्षेत्र सुमारे ६६,३०९ हेक्टर आहे. त्या विषयी माहिती देताना सुरत येथील फळबाग विभागाचे सहाय्यक संचालक दिनेश पडालिया यांनी सांगितले, की गेल्या काही वर्षांपासून अन्य पिकांच्या तुलनेमध्ये केळी पिकाने चांगला फायदा दिला आहे. त्यामुळे भरूच, सुरत आणि नर्मदा जिल्ह्यामध्ये या पिकाखालील क्षेत्र अनुक्रमे १२,५७१ हेक्टर, ८७०५ हेक्टर आणि ८१६० हेक्टर पर्यंत पोचले आहेत. तसेच येथील गेल्या वर्षातील उत्पादन अनुक्रमे ८,९५,०५५ टन, ६,१०,२२० टन आणि ५,६३,०४० टन असे राहिले आहे. दक्षिण गुजरातमधील सुरतसह काही विभाग हे पूर्वी आंबा आणि ऊस उत्पादनासाठी ओळखले जात. गेल्या पाच वर्षांमध्ये केळी पिकामध्ये रोग व किडींचा कमी प्रादुर्भाव राहिलाय परिणामी दरामध्ये चढ उतार असले तरी बऱ्यापैकी शाश्वत उत्पन्नामुळे केळी पिकांकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com