agriculture news in marathi, band against the fuel price hike, mumbai, maharashtra | Agrowon

वाढत्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ उद्या बंद
टीम अॅग्रोवन
रविवार, 9 सप्टेंबर 2018

मुंबई : केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेल व गॅसच्या वाढलेल्या किमतींच्या निषेधार्थ काँग्रेसने सोमवारी (ता. १०) महाराष्ट्र बंद पुकारला आहे. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे.

मुंबई : केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेल व गॅसच्या वाढलेल्या किमतींच्या निषेधार्थ काँग्रेसने सोमवारी (ता. १०) महाराष्ट्र बंद पुकारला आहे. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे.

यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्‍हाण म्हणाले, की देशात पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमतींत फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमती या देशामध्ये सर्वात जास्त आहेत. पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमतींनी उच्चांक गाठलेला आहे. त्याचप्रमाणे महागाईसुद्धा प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमती वाढलेल्या असतानासुद्धा केंद्र व राज्य शासन गप्प बसलेले आहे. मे २०१४ नंतर शासनाने पेट्रोलच्या करात २११ टक्के वाढ केली. तसेच डिझेलच्या करात ४४३ टक्के वाढ केलेली आहे.

केंद्र व राज्य शासनाने पेट्रोल, डिझेल व गॅसवर अवास्तव कर लावल्यामुळे त्यांच्या किमती वाढलेल्या आहेत. यामुळे सर्व सामान्य जनता त्रस्त झालेली आहे. केंद्र-राज्य शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात काँग्रेस पक्षातर्फे बंद पाळण्यात येणार आहे. तसेच समविचारी धर्मनिरपेक्ष पक्षांनासुद्धा या बंदमध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये डॉ. सुजय विखे, शिर्डीत...नगर  : विसाव्या फेरीअखेर नगर लोकसभा...
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला;...कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक...
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य...नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा...
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...
अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी...अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के...
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच...
दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या...अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर...
खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप...जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊससिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह...
मराठवाड्यात नवीन खासदारांबाबत उत्कंठानांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता...सांगली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता....
सोलापूर, माढ्याच्या निकालाकडे देशाचे...सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५...परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे...
यसनी तोडून पुढे या : रमेश घोलपसोलापूर  : "परिस्थितीने बांधलेल्या यसनी तोडत...
पुणे विभागासाठी साडेपाच कोटींवर वृक्ष...पुणे  ः पर्यावरणाचे संतुलन अबाधित...
सोयाबीन उत्पादकांना पीकविम्याची रक्कम...मुंबई  : शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या...
आमदार निधीतून दुष्काळग्रस्त भागासाठी...मुंबई  ः दुष्काळग्रस्त भागातील जनतेला आमदार...