agriculture news in marathi, Bandara Gondia loksabha constituency | Agrowon

भंडारा-गोंदिया लोकसभेचा गड राखण्याचे भाजपसमोर आव्हान
विनोद इंगोले
मंगळवार, 30 जानेवारी 2018

नागपूर  : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत खासदारकीचा  राजीनामा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही पोटनिवडणूक लढवली तर त्यांच्याविरोधात लढण्याचे आव्हानदेखील त्यांनी दिले. पोटनिवडणुकीत गड राखण्याचे आवाहन भाजपसमोर निर्माण झाले आहे. 

नागपूर  : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत खासदारकीचा  राजीनामा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही पोटनिवडणूक लढवली तर त्यांच्याविरोधात लढण्याचे आव्हानदेखील त्यांनी दिले. पोटनिवडणुकीत गड राखण्याचे आवाहन भाजपसमोर निर्माण झाले आहे. 

नाना पटोले यांनी सुरवातीपासूनच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यशैलीला टिकेचे लक्ष्य केले. शेतीप्रश्‍नी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत ते अनेक शेतकरी आंदोलनांत सहभागी झाले. त्यामध्ये अकोल्यातील यशवंत सिन्हा यांनी केलेल्या आंदोलनाचाही समावेश होता. अकोल्यातील या आंदोलनात नाना एक दिवस सहभागी झाले होते. त्यानंतर ते पक्ष सोडतील हे स्पष्ट झाले. पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्या श्री. पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. 

भंडारा, गोंदिया लोकसभा मतदारसंघ क्षेत्रात आपली बाजू भक्‍कम करण्याची मोहीम त्यानंतर त्यांनी समर्थकांमार्फत राबविली आहे. ‘नाना के साथ जाना’ अशी घोषणा असलेले फलक या दोन्ही जिल्ह्यांत ठिकठिकाणी झळकू लागले आहेत. त्यातच नानांनी मुख्यमंत्री फडणवीस हे या मतदारसंघात लोकसभेची पोटनिवडणूक लढवतील तर त्यांच्या विरोधात लढू, असे वक्‍तव्य करत भाजपला खुले आव्हानच दिले. त्यामुळे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये रोष वाढीस लागला होता; परंतु या संदर्भाने पक्षाकडून कोणतेच वक्‍तव्य किंवा विरोधासाठी कोणीच पुढे येत नसल्याने त्यांच्यामध्ये अस्वस्थतादेखील निर्माण झाली होती. ही अस्वस्थता ओळखत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भंडाऱ्याचे पालकमंत्री दीपक सावंत यांचा राजीनामा घेत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पालकमंत्रिपद सोपविले. गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपदी समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले आहेत. 

कार्यकर्त्यांची घेतली बैठक
खासदार नाना पटोले यांनी भाजपसमोर आव्हान उभे केले आहे. त्यामुळे येणारी पोटनिवडणूक चुरशीची होणार असल्याची चिन्हे आहेत. त्यासाठीची तयारी म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत दोन्ही जिल्ह्यांतील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक ‘रामगिरी’वर घेतली. पटोलेंच्या जागी कोण? हाच बैठकीच्या अजेंड्यावरील विषय होता. बाहेरून आयात उमेदवार देऊ नका? अशी मागणी या वेळी कार्यकर्त्यांनी केली. पक्षातीलच योग्य व्यक्‍तीला उमेदवारी द्या, आम्ही सर्व त्याच्या पाठीशी राहू, असा विश्‍वास कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

इतर ताज्या घडामोडी
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...