लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया...!!!

लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया...!!!
लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया...!!!

लिंगदेव, जि. नगर : पहिल्या पावसाने हजेरी लावली आणि अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरातील जंगल रानांत रात्रीच्या काळ्या कुट्ट अंधारात काजव्यांची लखलखती दुनिया अवतरली. एकमेकांच्या प्रेमात धुद्फुंद होऊ पाहणाऱ्या या प्रकाशमय कीटकांमुळे जणू आकाशातील तारकाच जमिनीवर अवतरल्याचा भास होत असून, निसर्गात रंगलेला हा देखणा आणि अदभुत ''काजवा महोत्सव'' पर्यटकांचे लक्ष वेधून घेऊ लागला आहे.  भंडारदरा धरण परिसरातील मुरशेत, मुतखेल, पांजरे, घाटघर व रतनवाडीच्या घनदाट जंगलात साधडा, बेहडा या वृक्षांवर रात्रीच्या वेळी काळोख्या अंधारात काजवा नावाचा कीटक चमचम करत लखलखीत प्रकाश निर्माण करीत असतो. हे कीटक एकाच वृक्षावर हजारोंच्या संख्येने असल्याने भूतलावर जणू तारांगणच अवतरल्याचा अभास निर्माण होतो.  असंख्य काजवे एकाच वेळी लयबद्धपणे चमकतात, हा निसर्गाचा अाविष्कार डोळ्यांचे पारणे फेडतो. हाच निसर्ग सौंदर्याचा अदभुत चमत्कार पाहण्यासाठी पर्यटकांना भुरळ पडते. हे मनमोहक दृश्य आपल्या नजरेत कैद करण्यासाठी राज्यभरातून पर्यटकांची झुंबड उडत अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com